Bluepad | Bluepad
Bluepad
जीवन हे कधीच व्यर्थ नसत आपली जाण्याची पद्धत व्यर्थ असते
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
25th Jan, 2023

Share

*जीवन हे कधीचं व्यर्थ नसतं आपली जागण्याची पद्धत व्यर्थ असते*
निसर्गाने निर्माण केलेली पृथ्वीवरील कोणतीही गोष्ट व्यर्थ नाही.आपण वापर अयोग्य करतो . आणि दोष देऊन मोकळे होतो. मर्यादित वापर हाच सुयोग्य परिणामांचा मुख्यआधार स्तंभ असतो. वापराची मर्यादा उलटता कामा नये.पण आपण हि मर्यादा जाणीवपुर्वक ओलंडतो आणि मग शेवटी बोलतो . जीवन व्यर्थ आहे हे व्यवहारीक नाही.जगात कोणतीही गोष्ट बाब व्यर्थ नाही हे ञिकाल सत्य असुन आपण वापर कसा कारतोय त्यानुसार त्या बाबीची व्यवहार्यता ठरत असते . प्रमाण आणि मात्र समजली तर व्यर्थ कही ठरत नाही .पण प्रमाण आणि मात्र चुकली कि मग मात्र सगळी गडबड झाली म्हणून समजा . जीवनात कधीचं चुकुन सुद्धा प्रमाण आणि मात्रा चुकु देऊ नका मग पाहा आपलं जीवन हे आपल्याला कधीच व्यर्थ वाटणार नाही फक्त जगण्याची पद्धत चुकली तर मग मात्र जीवनच गणित बिघडल्याशिवाय राहणार नाही. गणित बिघडल कि हिशोब चुकतो.हिशोब चुकला कि मुल्यमापन व दोषारोपण चालू होतं.आपल्या चुकीचे खापर कोणावर तरी फोडून मनात थोडी उसंत घेऊन बरं वाटतं पण हे बरं खरच खरं असतं का असं जर मला कोणी विचारलं तर मी चक्क हे खोटं आहे असंच सांगेल. जीवनाला अगोदर समजुन घ्या. योग्य मार्ग निवडा सकारात्मक मार्गक्रमण करा सत्याची कास धार,मोह माया, स्वार्थ याला फार थारा देऊ नका आध्यत्मिक सात्विक वृत्ती जोपासा, निर्व्यसनी व्हा मग पाहा जीवन कधीचं व्यर्थ वाटणार नाही. जीवनाचा मार्ग आपण चुकतो व दोष दुसर्याला देतो‌ . मार्ग चुकण हा आपला दोष आहे हे सत्य नाकरण म्हणजे सुर्याच अस्तित्व नाकारल्या सारखं आहे. आपला दोष आपण तो मान्य करणं गरजेचं असतं पण दोष मान्य करणं हा मानवी स्वभाव नसल्याने तो मान्य करत नाही. त्यामुळे आपल्या सुधारणांचे मार्ग बंद पडतात व आपण सुधारण्या ऐवजी अधिकच बिघडतो.एखादी बाब चुकली मान्य केली समजली दुरूस्त केली तर आपण योग्य ठिकाणी पोहचतो.पण आपण खरंच असं करतो का तर नाही करत. आपण सत्य स्वीकारण्या ऐवजी दोष देण्यावर जास्त भर देतो .सार्थकता आणि व्यर्थता हे शब्द परस्पर विरोधी असले तरी याचे परिणाम पण तसेच परस्पर विरोधी आहेत.जर आपलं कार्य सार्थकी असेल किंवा आपल्या जीवनात सार्थकता असेलतर मग निरर्थक असं काहीच नसतं . जीवनात व्यर्थ असं काहीच नसतं वापराची पद्धत परिणाम ठरवतं असते. सुयोग्य वापर सुयोग्य परिणाम अयोग्य वापर अयोग्य परिणाम म्हणजे जसा वापर तसा परिणाम असल्याने जीवन हे कधीच व्यर्थ नसत .जीवन‌ जगण्याची पद्धत जीवनातील परिणाम निश्चित करत असते . जशी पद्धत तसे परिणाम निश्चित होत असतात . म्हणून जीवन जाण्याची पद्धत जर आपली योग्य असेल तर आपल्याला सुयोग्य परिणाम मिळतील.आणि जर पद्धत चुकली किंवा चुकीची असली तर मग मात्र परिणाम हे अयोग्य प्राप्त होतील. जीवना विषयी असणारा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा एक सारखा असु शकत नाही . प्रत्येक जीवाच जीवना विषयी मत वेगळं आहे.जसं आपलं जीवन तसा आपला दृष्टीकोन असतो . मुळ जीवन हे कधीच व्यर्थ नसतं .जीवन जगण्याची पद्धत व्यर्थ असते . चुकीच्या पद्धती मुळे आपल्याला जीवन निरर्थक वाटू शकतं .हे स्वाभाविक आहे.पण मुळात जीवन हे कधीच व्यर्थ निरर्थक नसतं.आपला जीवना विषयीचा समज हा कसा आणि काय हा आपल्या जगण्याच्या पद्धतीवर‌ अंवलबुन आहे . आपल्या सवयी आपल्या आवडी निवडी ह्या जपत असताना आपण कोणत्या बाबींचा प्रभाव आपल्या आयुष्यात करून घेतो त्यानुसार मग त्याची फेड परतफेड करताना आपल्या नकी दम येतो . मुळात कोणती बाब कशासाठी करायची आहे त्याचे दिर्घ कालिन परिणाम काय हे समजलं तर मग बहुतांश चुका टळतात आणि आपण योग्य दिशेने मार्गक्रमण करतो आणि आपण जेव्हा योग्य मार्गावर असु तेव्हा आपल्याला जीवन पण योग्य वाटणार हे मात्र निश्चित.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad