Bluepad | Bluepad
Bluepad
"चैत्र पालवी" *.!!
बालाजी ढगे
बालाजी ढगे
24th Jan, 2023

Share

निसर्ग आपला मित्र. त्यांचे बरे वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतात
मुख्य ऋतू तीनच. ऊन्हाळा पावसाळा व हिवाळा. निसर्ग पावसाळ्यात झाडेवेलीनी सुंदर नटलेला असतो. तशी परिस्थिती हिवाळ्यात दिसून येत नाही. उपऋतू ही सहा गणले जातात. डिसेंबर जानेवारीत हेमंत संपून शिशिराची लगबग चाहूल लागलेली दिसून येते. गुलाबी गारवा संपून गारठ्याला सुरवात झालेली असते. हा बदलही शरीर प्रकृतीवरही जाणवायला लागतो.
निसर्ग हा आपला मित्र निसर्गाकडे आपण सुक्ष्म नजरेने पाहिले तर त्यातील होत असलेले बदल जाणवतात. स्थितप्रज्ञा सारखी वा योगीमुनीसारखी समाधी अवस्थेत असल्या सारखी जाणवतात. ही झाडे हिवाळ्यात थंडीचा कडाका सोसूनही गप्प गुमाण आपल्या जागी स्थीर राहतात. पण मानव अंगात स्वेटर घालून डोक्यावर लोकरी टोपी घालून थंडीचा प्रतिकार करीत ... गुलाबी थंडीचा आनंद ऊपभोगत असतो पण वृक्षाकडे निरिक्षण करीत असता योगी मुनीसारखी ही झाडे थंडीतही आनंदाने वार्यावरती खुशाल डोलत असतात. ही झाडे हिवाळ्यात स्थितप्रज्ञा सारखी भासतात. असा हा निसर्ग सदा बदलत असतो. काय. निसर्गाचा महिमा काय वर्णावा गडे..? निसर्गाला शिशिराची चाहूल लागलेली असते. वृक्षावरील जीर्ण पाने साध्या झुळूकी बरोखर खाली गळावयास सूरू झालेली असते. असा हा निसर्गातील बदल नजरेत भरतो. निसर्ग वैराण दिसायला लागतो. सृष्टीचे वैभव या काळात कमी झाल्याचे जाणवते. निसर्गाच्या या प्रसव वेदनाच का? असे वाटते. माळरानावरील वृक्ष ऊघडे बोडके दिसतात. झाडावरील हिरवी पाने या शिशिर काळात पिवळी पडून गळती सूरू होते. निसर्ग महिमा अगाध आहे. असेच वाटते. निसर्गाच्या या अदभुत तर्हा मानवी मनाला जाणवायला लागतात. पूढे निसर्गाला वसंताची चाहूल लागलेली जाणवते. निसर्गाचा हा विरहकाळ पर्णाविणा वृक्ष डोंगर माथ्यावर नजरेत पडतो. विषेशत: पळस हा वृक्ष शिशिरात अंगाला भस्म फासून लावल्यागत दिसतो एरव्ही तसा तो नसतो पण शिशिरात त्याची अवस्था योग्यासमान भस्म लावलेल्या अवलिया सारखी दिसते. तोच हा पळस वनात वसंत वैभव खेळत असताना लाल चुटूक पुष्पानी बहरून येऊन अल्लड बालका सारखा दिसतो. काय ही निसर्गातली विविध रूपे. आम्रवनी वृक्षाला मोहोर आलेला असतो. अन त्याचा सूगंध आसमंत गंधित करीत असतो आम्रवृक्षावर कोकीलारव ऐकू येतो. काय हे निसर्ग गीत* कोकिळा आम्रवृक्षावर गायन चाललेले असावे असे मानवी मनाला वाटते.
"चैत्र पालवी" *.!!
असा हा निसर्ग शिशिर ऋतुच्या वेदना अन वसंतात सृष्टीचे वैभव ऊघड्या डोळ्यानी पाहवे अन जीवनी तृप्त व्हावे. असे वाटते.
💐🌸🎉🌸💐
~बालाजी ढगे.
साहित्य भुषण.
देगलूर.
९९७०६०७१८४.
💐🌸🎁🌸💐

0 

Share


बालाजी ढगे
Written by
बालाजी ढगे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad