कुणीच कुणाचं नसत या जगात
सहसा कधी ना कधी असं म्हटलं जात
पण का म्हणून कुणावर इतकं अवलंबून रहावं
नाही तर नको असं का होत नाही.
माझ्या दुःखात मीच होते सोबतीला
नयना तुन अश्रू आले तेही मीच पुसले
मिठी मारायला हीं कुणीतरी हवं होत
तरीही स्वतःचा स्वतःला कवटाळलं
कुणी नव्हतं समजून सांगायला
तेव्हाही स्वतःचा स्वतःला समजावलं
हसणं विसरलो होतो बहुतेक
जगण काय असत हे हीं कळतं नव्हतं
तरीही नव्याने आधार देऊन सावरलं
इतकं साऱ्यातही कुणी कुणाचं आहे का
कधी कधी मनातलं सांगायची हिम्मत होत नाही
इतक्या जवळ कुणाच्या जाता येत नाही
अश्या वेळी वाईट विचाराचं वर्चस्व असत
तर काय करावं....
स्वतःला धीर देऊन
संघर्षाचे ते धडे स्वतःहून गिरवावे
अति वाईट काळातही स्वतःहून स्वतःस आधार द्यावा
त्या phase ला नीट हाताळव...
मन दुःखी असता काही कळतं नसत
मनाचा कमजोर पणा अन अश्रुंचा पूर.
नकारात्मकता अन असह्य यातना
रडन पडणं कोसळण ओरडण किंचाळण
एक वेगळीच लढाई.. जी लढावी
कितीही भयंकर परिस्थिती असली तरीही
कुणीही सावरायला आजूबाजूला नसलं तरीही
स्वतःच्या आयुष्या साठी स्वतःच
स्वतःची ढाल अन तलवार व्हावं..
देवावर अन स्वतःवर विश्वास ठेवावं अन
शेवटच्या श्वासापर्यत लढत राहावं.....