काश आयुष्य हे एक पुस्तक असतं...
वाचू शकलो असतो मी की पुढे काय होणार..
काय मिळू शकू मी, काय माझं मन विसरणार
कधी थोडा आनंदी होणार, कधी मन रडणार
कळाले असते मला...
काश आयुष्य हे खरच पुस्तक असतं
फाडले असते ते क्षण ज्यांनी मला रडवले..
आणि..
जोडले असते असे काही पाने त्यांच्या आठवणीने मला हसवले..
गमावले किती, मिळवले किती हे मोजू तर शकलो असतो..
काश आयुष्य हे खरंच एक पुस्तक असतं...
जितके सोपी लहानपणीचे जीवन असते, तितकेच मोठे झाल्यावरचे कटिंग..
हे वेळेनुसार न कळता लगेच कळले असते
एखाद्या गोष्टीची ठेच लागण्याच्या आधीच, स्वतःला सावरून चालता आले असते...
नेहमी ठेच पायालाच लागते असे नाही, कधी कधी मनालाही लागते
काळाला नव्हे तर वेळेला सुद्धा घाबरून मागे गेलो असतो..
तुटलेली स्वप्ने पुन्हा नव्याने, नव्या अशाने सुधारली असती..
काही क्षणासाठी मी सुद्धा हसलो असतो..
काश आयुष्य हे एक खरच पुस्तक असतं...