Bluepad | Bluepad
Bluepad
✍️✍️
Pratuu...
Pratuu...
24th Jan, 2023

Share

कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्या वर चिडणं खूप सोप्पं आहे पण त्याला न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे. निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघुन जाते. जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघुन जाते, हवा आली की उष्णता निघुन जाते, प्रकाश आला की अंधार निघुन जातो तसे आपल्याला चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघुन जातात. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेंव्हाच तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय, आणि कोण सावरायला येतंय. कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत. आवश्यक्तेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब, सर्व काह असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्देव आणि थोडे कमी पडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य.माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस कपडे बदलतो तो दुःखीच असतो, कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.

0 

Share


Pratuu...
Written by
Pratuu...

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad