धीरेन्द्र शास्त्री बागेश्वर धाम Vs वाट चुकलेला मानव
प्रोफेसर श्याम मानव "अंधश्रद्धा निर्मूलन समिती" चे संस्थापक १९८२ साली. जे काम खऱ्या हिंदू धर्म जनजागृती चे तेच् नेमके कार्य ह्या समितीने उचलले. देशातील बनावटी तांत्रिक, मांत्रिकांना, संतांना धडकी भरली.
उंच भराऱ्या मारीत ९ सप्टेंबर १९५१ साली सधन शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्याम मानवांनी २००५ सालापासून लंबित "एंटी ब्लॅक मॅजिक एक्ट" "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती" चे संस्थापक नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या हत्येनंतर २०१४ साली पारित करण्यात यश मिळवले.
हिंदू धर्म विविध अध्यात्मिक चमत्कारांनी भरपूर आहे असे सामान्य जनांचे मत असते. त्यापायी झाडफुक करणारे बुवा ह्यांचे फावते. रोगी जर झाडफुकाने बरा झाला तर बुवाबाजीला अजून चालना मिळते तर काही रोग्यांचे नाहक प्राण पण जात असावेत. पण समाज काय म्हणेल म्हणून हे सगेसोयरे गप्प बसत असतील. तर परत बुवाबाजी चे फावत असणार.
तसे वरवर बघितल्यास उद्देश जरी चांगला असला, थोडा जम बसला की मग आर्थिक स्त्रोत कसा वाढवता येईल? संघटना कशी मोठी करता येईल? ह्यासाठी मानवांनी "स्वसंमोहन आणि संमोहनशास्त्र" चे क्लासेस चालविणे सुरू केले असावेत. संमोहनशास्त्र खरे म्हणजे अतिशय धोकादायक व एका अर्थाने प्राध्यापक श्याम मानव हे संमोहनशास्त्र पारंगत आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी. ह्याचा परिपाक म्हणजे दाभोळकरांचा खुन प्रा. श्याम मानवांनी संमोहनशास्त्राचा प्रयोग करीत केला. ते देखील दोन कोटीचे शासकीय अनुदान हाटण्यासाठी केला, असा गंभीर आरोप श्याम मानवांवर करण्यात आला. (लोकसत्ता २९ सप्टेंबर २०१५) एखाद्या संमोहनशास्त्र पारंगत प्राध्यापकावर असे आरोप लागणे अगदी साहजिक आहे. त्यात तथ्य असो वा नसो. त्याचप्रमाणे जर कोणी समोरासमोर त्यांच्याशी युक्तिवाद करतोय तर कशावरून श्याम मानव त्यांना संमोहनशास्त्राने माघार घ्यायला बाध्य करीत नसावे? मोठमोठ्या सभा प्रा. श्याम मानवांनी गाजवल्या त्या कशावरून संमोहनशास्त्र प्रत्यंचेत चढवून सभेला संमोहनशास्त्राला बळी पाडून, प्रेक्षकांच्या नकळत प्रेक्षकांची मने जिंकून, प्रेक्षकांना तोंडघशी पाडले नसावे? असे अनेक प्रश्न मनात येतात. बरे! त्यांची स्वसंमोहन आणि संमोहनशास्त्र यांची शाळा मोफत आहे का? नाही, चांगले २५००-३५०० रुपये शुल्क आहे. म्हणजे काय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नावाखाली पैसा कमाविण्याचा धंदा सुरू आहे. नाव मोठे झाले की अशा बुवाबाजांचे फावते नी मग "स्वसंमोहन आणि संमोहनशास्त्र" पैसा घेऊन शिकविले जाते. म्हणजे एकंदर काय पैशासाठी तांत्रिकाची बुवाबाजी काय अन् नाव मोठे झाल्यावर पैशासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बुवाबाजी काय? दोन्ही सारखेच. असे आपण म्हणू शकतो.
प्रा. मानवांबद्दल पुर्व ग्रह दुषित मत नसून एक त्रयस्थ ह्या नात्याने अवलोकन आहे. जसे प्रा. मानव हिंदू रूढींविरुद्ध सहज आपला पावित्रा तीव्र करतात. हिंदू रुढींवर कुठराघात करण्याचा प्रयत्न करतात. तसा त्यांनी शांतीदूत मुल्ला मौलवी ह्यांचेवर हलाला, बुरखा पद्धती, चार बिवी, चालीस बच्चे, हे विषय कधी हातात घेतल्याचे आढळले नाही. मदरस्यामध्ये त्यांना देण्यात येणारे धार्मिक शिक्षण ह्यावर कधी आवाज उठवलेला बघितला नाही. त्याचप्रमाणे ख्रिश्चन रुढींवर, ख्रिसमस ट्री लावण्यावर, सांताक्लॉज ही मुलांना मुर्ख बनविण्याची संकल्पना आहे असे कधी ठोकुन ओरडून सांगितल्याचे आठवत नाही. म्हणजे प्रा. मानवांच्या "अंधश्रद्धा निर्मूलन समितीची" भिस्त पुर्ण हिंदू समाजातील अंधश्रद्धेवर आधारित असे म्हणण्यास हरकत नाहीं. कारण शांतीदूत आणि ख्रिश्चन अंधश्रद्धेविरुद्ध लढा पुकारला असता तर त्याचे कदाचित दुष्परिणाम भोगावे लागतील ही भिती असावी. कदाचित आयुष्याची दोरी छोटी होईल अशी हिरवाधारी विवंचना असावी. म्हणून त्यांनी आपले लक्ष फक्त हिंदू समाजातील वाईट चालीरितींवर केंद्रित केले असावे. कारण त्यांचा नशीबावर भरोसा नाही. कर्तृत्वावर भरवसा, म्हणून कदाचित त्यांनी आपले कर्तृत्व हिंदू पर्यंत सिमीत ठेवले असावे. पत्रकार प्रदीप भंडारी ह्यांनी जेव्हा Zee news वर हा प्रश्न विचारला त्यावेळी प्रा. मानवांनी ह्या प्रश्नाला बगल दिली. प्रदीप भंडारीचा प्रश्न आहे तो बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री अंधश्रद्धा संबंधीत - "पाद्री आणि मौलवींवर सुद्धा तुम्ही अशा प्रकारची कारवाई ह्या पुर्वी केली आहे का?" ह्या प्रश्नावर प्रा. मानव काहीही बोलले नाहीत. मात्र ते जेव्हा "भारत जोडो"यात्रेत सहभागी झाल्याचे राहुल गांधी सोबत चे फोटो येतात, त्यावेळी लक्षात येते की धीरेंद्र शास्त्री वर अंधश्रद्धा पारितोषिक ३० लाख रुपयांची रक्कम येते कुठून? प्रा. श्याम मानवांच्या अंधश्रद्धा कुठे आहेत! कोणती संस्था आपल्या खिशातून ३० लाख रुपये काढून देते? हे पैसे स्पॉंसर कोण करणार? हा प्रश्न महाराष्ट्र सरकारने किंवा मध्यप्रदेश सरकारने निश्चित पणे प्रा. श्याम मानव ह्यांना विचारणे आवश्यक आहे. तसेच ह्या मुलाखतीत ते सांगतात की त्यांनी एक पारितोषिक २५ लाख रुपयांचे पण जाहीर केले होते पण स्टुडिओ मधील मुलाखत घेणारा आणि चॅलेंज स्विकारणारा, दोघे ही पळून गेले. २५-३० लाख एवढाले पारितोषिक एक संस्था जाहीर करते, तर त्या मागचा बोलविता धनी कोण? त्याचप्रमाणे ह्यांची चाल राहुल गांधी " भारत जोडतो" यात्रेची आहे तर ह्यांचा अजेंडा सुद्धा राहुल गांधी सारखा गळ्यात जानवे अडकवून हिंदू संस्कृती चा गळा घोटायचा असू शकतो. हे म्हणण्यामागे देखील तथ्य आहे. ते असे—- म्हणजे प्रा. श्याम मानवांचे हिंदू असून देखील कार्यसंकेत असे की "दुसऱ्याची ठेवायची झाकुन अन् आपलीच दाखवायची खोलुन" त्यांच्याच् भाषणातील अंश "आत्मा" ह्या संदर्भात देत आहे. "आत्मा" नाही असे मानवांना म्हणायचे आहे. त्यासाठी त्यांचे दाखले मात्र पाश्चात्य आहेत. सभेला कदाचित संमोहन वश करुन केलेले भाषण असावे. "जोतीषशास्त्र" भाषणातील भाग पुढीलप्रमाणे!
आपल्या ज्ञानाला असलेल्या मर्यादे मुळे "आत्मा" आहे असे आपण मानतो. मेडिकल सायन्स नुसार आणि दीर्घकाळाच्या अभ्यासानुसार आत्मा सापडू शकत नाही आणि त्याचा उल्लेखही नाही. जीवंत आहे पण जिला body नाही. अशी कुठलीही वस्तू सापडली नाही म्हणून आत्मा असू शकत नाही. There can't be a life without body. असे श्री मानव मानतात आणि सभेला समजावतात. जिला body नाही त्या आत्म्याला बुद्धी असु शकते का? अर्थात नाही. कारण बुद्धी आपल्या brain मध्ये असते. असे प्रा. मानव आपल्या प्रवचनात सभेचा बुद्धी भ्रंश करतात. असे आपण म्हणू शकतो. कारण कदाचित सभा त्यांच्या संमोहनशास्त्रात जखडली गेली असावी. कोण जाणे श्याम मानव संमोहनशास्त्र पारंगत आहेत. पुढे ते म्हणतात की वॉल्डर एस. ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या ने दहा प्रकारच्या मानवी भावना माणसाच्या ब्रेनमध्ये निहीत असतात. ते १० ब्रेन सेंटर मज्जातंतू Electrochemical impulses stimulate करीत असतात. जर प्रेमाचे (with particular medicine) injection दिले आणि जर मेंदु मध्ये प्रेमाचे ब्रेन सेंटर जर stimulate झाले तर समोर गटारातील म्हैस जरी समोर उभी केल्यास त्या व्यक्तिची प्रेमभावना जागृत होते. दोन बंदर नर असले इंजेक्शन घेतल्यावर एकमेकांवर प्रेम करायला लागतात. थोडक्यात काय? मेल्यानंतर माणूस मेंदू घेऊन जात नाही म्हणून आत्मा अस्तित्वात नाही. असे संमोहनशास्त्र पारंगत प्रा. श्याम मानव सभेला पटवून देण्यात यशस्वी होतात! करा टाळ्यांचा कडकडाट!!!! त्यांचे मते विज्ञान ठामपणे सांगू शकते की आत्मा अस्तित्वात च् नाही. केवळ पाश्चात्य उदाहरणावरून भारतातील एक ही दाखला न देता ठामपणे भाषण देणारे प्रा. श्याम मानव आणि त्यांना एकसुद्धा प्रश्न न विचारणारा त्यांचा संमोहित श्रोतृवृंद. एका ही भल्या श्रोत्र्याने विचारले नाही की - गीतेमध्ये १८ वा अध्याय -
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।2.23।।
2.23।।आत्मा सदा निर्विकार किस कारणसे है सो कहते हैं
इस उपर्युक्त आत्माको शस्त्र नहीं काटते अभिप्राय यह कि अवयवरहित होनेके कारण तलवार आदि शस्त्र इसके अङ्गोंके टुकड़े नहीं कर सकते।
वैसे ही अग्नि इसको जला नहीं सकता अर्थात् अग्नि भी इसको भस्मीभूत नहीं कर सकता।
जल इसको भिगो नहीं सकता क्योंकि सावयव वस्तुको ही भिगोकर उसके अङ्गोंको पृथक्पृथक् कर देनेमें जलकी सामर्थ्य है। निरवयव आत्मामें ऐसा होना सम्भव नहीं।
उसी तरह वायु आर्द्र द्रव्यका गीलापन शोषण करके उसको नष्ट करता है अतः वह वायु भी इस स्वस्वरूप आत्माका शोषण नहीं कर सकता।
इतके स्पष्ट गीता सांगते पण प्रा.श्याम मानव मात्र मेडिकल सायन्स चे दाखले पाश्चात्य दाखले ह्यावर विश्वास करतात. म्हणजे श्रोत्यांच्या नकळत संमोहनात फसवुन "अंधश्रद्धा निर्मूलन समिती" वर अंधश्रद्धा ठेवा असे तर श्याम मानव सुचवीत नाहीत?
मेडिकल सायन्स ला मर्यादा आहेत. हिंदू संस्कृती वेद पुराण आयुर्वेद वगैरे सारखे ते अमर्याद नाही. सनातन संस्कृती मेडिकल सायन्स सारखी संकुचित नाही किंवा मर्यादित नाही. आमचे ऋषी, संत ह्याचा अर्थ शास्त्रज्ञ. सुक्ष्म रुप धारण करून जग कल्याणासाठी अनेक शोध लावणारे सर्वसंपन्न.
पण पाश्चात्य मेडिकल सायन्स ह्याला मानत नाही. पण जे मेडिकल सायन्स ला माहिती नाही, कळत नाही किंवा माहिती करण्याची पात्रता नाही, तर काय मेडिकल सायन्स पलिकडे जग संपले का? जिथे मेडिकल सायन्स संपते तिथे मेडिकल सायन्स ची फक्त मान्यता संपते. आणि प्रा. श्याम मानव आपला पुर्ण भरवसा मेडिकल सायन्स वर ठेवतात आणि निर्णयाप्रत पोहोचतात की मेडिकल सायन्स ने नाही म्हटले तर विज्ञान निष्ठेवर आधारित "आत्मा" नाही. मानवांनी वेद पुराण शास्त्राचा दाखला कुठेही घेतला नाही. मेडिकल सायन्स वर मानवांची अंध अंधश्रद्धा शरण जाते आणि श्याम मानव सभेत विजयी मुद्रेने सांगतात की दर्शक हो तुम्ही जे समजत आला ते चुकीचे आहे. आत्मा ही संज्ञा अस्तित्वात नाही. म्हणजे गीते मध्ये नैनं छिन्दन्ति भगवान श्रीकृष्ण म्हणाला, ते काय चुक होते? जग, निसर्ग, सृष्टी ह्या पलिकडे आहे. जग फक्त मेडिकल मान्यतेपर्यंत संपत नाही. जिथे मेडिकल सायन्स ची मर्यादा संपते त्यापुढे आमची हिंदू संस्कृती सुरू होते, हे सांगायला श्याम मानव विसरतात. एकंदर काय मानवांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाला पाश्चात्य विज्ञानाची अंधभक्ति दिसते.
प्रा. श्याम मानव शरीरातील गेलेला प्राण, चैतन्य, किंवा आत्मा कुठे गेले? विज्ञानाचे पुरस्कर्ते म्हणवता - The law of conservation of energy states that Energy can neither be created nor destroyed, rather it transforms from one form to another. तर जीवंत पुरुषातील चैतन्य म्हणा, जीवंतपणा म्हणा किंवा आत्मा म्हणा कुठे गेला? ह्याचे उत्तर प्रा. श्याम मानवांनी दिले नाही ते गीते मध्ये आहे. प्रा. श्याम मानवांनी आपल्या वेदग्रंथांचा अभ्यास केला असता तर ते आज ४० वर्षांच्या तपश्चर्येनंतर कदाचित ऋषी - शास्त्रज्ञ झाले असते. सुक्ष्म रूपात जाऊन कितीतरी शोध लावले असते. असे कधी कधी मनाला वाटते. असे वाटते हा वाट चुकलेला मानव आहे.
त्यानंतर प्रा. मानवांनी नशीब आणि कर्तृत्व ह्यावर प्रचंड उहापोह करतात. नशीबात आहे तर कर्तृत्व करण्याची काय गरज? पुस्तके जाळुन टाका? नशीबात असेल ते होईल. एकंदर काय, "दे गा हरी खाटल्यावरी" एकतर नशीबावर विसंबून राहा किंवा कर्तृत्ववान बना. दिलेले तर्क मनाला पटण्यासारखे नाहीत. "काय माहित - नशिबात लिहिले असेल की कर्तृत्व केल्यास जीवनात यश मिळेल" अशा एका वाक्यात त्यांनी फिरवून फिरवून चघळलेले नशीब कर्तृत्व आपण संपवू शकतो.
त्यानंतर श्याम मानवांचे म्हणणे आहे की ऋषी मुनी सुक्ष्म रूपात मंगळ ग्रहावर, गुरू ग्रहावर जाता येते. असे म्हणतात. त्यासाठी प्राध्यापक मानव चॅलेंज करतात की इतके दूर जाण्याची गरज नाही, बाजुच्या खोलीत मी पाच वस्तू ठेवतो त्या तुम्ही बसल्याजागी सुक्ष्मदेहाने जाऊन ओळखा. किती हास्यास्पद चॅलेंज आहे. सुक्ष्मरूप धारण करण्याची शक्ती किंवा कला आपल्या भीमरूपी स्तोस्त्रामध्ये आहे. "अणूपासूनी ब्रम्हांडा एवढा होत जातसे" त्यानंतर प्रा. श्याम मानव म्हणतात काहो मंगळावर कोणी दहा मिनिटात जाऊन येते काय? मानव साहेब ह्याला "मनोवेग" म्हणतात. ह्याचा उल्लेख पण ह्याच स्तोत्रात आहे.
"आणिला मागुती नेला! आला गेला मनोगती!
मनासी टाकिले मागे! गतीसी तुळणा नसे!"
हे फक्त स्तोत्रात लिहिले नाही तर हनुमान बालाजी ने लक्ष्मणासाठी संजीवनी वनस्पती आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला त्यावेळी चे विश्लेषण सांगते की हनुमानाचा वेग ताशी २५००-३००० कि.मी. प्रति तास असावा. श्रीलंकेला जोडणारा "रामसेतू" रामायण घडल्याचे प्रमाण आहे. राहिली गोष्ट भिंती पलिकडल्या तुमच्या पाच वस्तू ओळखायची! सुक्ष्म रूप धारण करणारा संत, तुमच्या ह्या फालतू मागणीला भीक घालेल असे तुम्हाला वाटते का? हा तोच बालाजी आहे ज्याची कृपा धीरेंद्र शास्त्री वर आहे ज्याला तुम्ही चॅलेंज केले. खरे तपस्वी ऋषी मुनी अरुंधती-वसिष्ठ जे तारे एकमेकांभोवती फिरतात (असे खगोलशास्त्रीय एकमेव उदाहरण) असे शोध लावतात. प्रा. मानव सांगू शकतील की हा शोध कसा लावला? कोणता ऋषी तिथे कसा पोहोचला? प्राणवायू संपल्यानंतर वर जाताना तो ऋषी जिवंत कसा राहिला? वापस आल्यानंतर त्या ऋषीचे वय किती अब्ज वर्षे होते? प्राध्यापक साहेब हिंदू संस्कृती ला इतके हीन समजू नका. ज्यावेळी पाश्चात्य देश बोळ्याने दुध पित होते त्यावेळी भारतात विमान होते. तुम्ही हिंदू आहात म्हणून तुमचा मान आणि अदब बाकी तुमचे नी आमिर खान चे काम एकच् हिंदू चालीरीती टराटरा फाडुन टाका नी होत्याचं नव्हतं करून टाका. म्हणून म्हणतो की हा वाट चुकलेला मानव आहे.
प्रा. मानव ह्यांचे वतीने ऍडव्होकेट विनोद बापट - कोर्टात प्रश्न विचारतात की - सुक्ष्म देह आहे काय? आत्मा नावाची गोष्ट आहे काय?
त्यावर कोर्टात विज्ञाननिष्ठ MBBS चे उत्तर - आमच्या शास्त्रात आत्मा आणि सुक्ष्मदेह मानला जात नाही.
हा संवाद सभेमध्ये हा वाट चुकलेला मानव मोठ्या उत्साहात सांगतो की आत्मा आणि सुक्ष्मदेह अस्तित्वात नाही. आणि हा व्हिडिओ बघणाऱ्यांना वाटते की प्रा. श्याम मानवांच्या संशोधनाला मर्यादा आहेत. कोर्टात त्यांनी फक्त पाश्चात्य विज्ञान जोखले. खरे भारतीय विज्ञान त्यांना माहीत नसावे. किंवा पुर्व ग्रह दुषित कारणास्तव आमचे वेद अपौरुषेय म्हणून हलक्यात घेतले. किंवा प्रा. श्याम मानव हे हिंदू विरोधी अजेंडा चालवित असावे. असा तर्क आपण इथे देऊ शकतो. कारण शांतीदूत आणि ख्रिश्चन अंधश्रद्धा ह्यांना मान्य असाव्यात. Easy target म्हणजे हिंदू.
ह्याच त्यांच्या भाषणात त्यांनी विषय काढला तो फलज्योतिष - Astrology ह्या विषयावर बोलताना Tetrabiblos written by Claudius Ptolemy, publication date 2nd century. ह्यांच्या चार पुस्तकांचा दाखला देतात. त्यांचे म्हणण्यानुसार त्याकाळात ह्या शास्त्राला आपल्याकडे "ज्योतिर्विद्या" म्हणत. त्याचप्रमाणे भारत, नेपाळ, चीन "होराशास्त्र" ह्या ग्रंथाचा उपयोग करीत. पण हा अपौरुषेय आहे असे सांगत त्यांनी "होराशास्त्र" मध्ये काय सांगितले आहे, हे सांगण्याचे टाळले.
पुढे प्राध्यापकांचा विश्वास "गॅलिलिओ" वर. त्यांचे दृष्टीने वराहमिहीर चा उल्लेख प्रा. श्याम मानवांनी आपल्या भाषणात १००% दरकिनार केला आहे. म्हणून मुद्दाम "वराहमिहीर" ह्यांची महती इथे देत आहे.
आपले खगोलशास्त्री "वराहमिहीर (४९९-५८७ ईस्वी) भारतीय ज्योतिष शास्त्राचे "होराशास्त्र" चे निर्माता. जन्मकुंडली बनविण्याच्या पद्धतीला "होराशास्त्र" म्हणतात. ऋषी वराहमिहीर ह्यांनी सर्वात पहिले सांगितले की अयनांश चा मान ५०.३२ सेकंदा एवढा आहे. वराहमिहीर ह्यांचे विविध शोधकार्य आहेत ज्यामध्ये समय मापक घट यंत्र, इंद्रप्रस्थ मध्ये लोहस्तंभाचे निर्माण, ईरानचा तत्कालीन राजा नौशेरवा ह्यांचे निमंत्रणावरून वेधशाळेची स्थापना. होराशास्त्र व्यतिरिक्त वराहमिहीर चे इतर उपयुक्त ग्रंथ आहे.
वराहमिहीर हे नाव कसे पडले? त्यांचे पहिले नाव मिहीर! राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य च्या पुत्राच्या मृत्युचा दिवस सांगितला. ज्योतिष शास्त्रावर आधारित कुंडली नूसार त्याचा मृत्यू अटळ आहे. त्याला जंगली डुक्कर मारेल. राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य ने राजपुत्राला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र सरतेशेवटी राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य च्या पुत्राचा मृत्यू. राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य ने ज्योतिष मिहीर ह्यांचा दरबारात बोलावून सत्कार केला. "पुर्ण ज्योतिषी" म्हणून सन्मान केला. मगध देशाचा सर्वोच्च पुरस्कार "वराह चिन्ह" देवून सन्मानित केले. त्यानंतर मिहिर ह्यांना "वराहमिहीर" ह्या नावाने ओळख मिळाली. ५५० ईस्वी चे आसपास वराहमिहीर ने तीन महत्वपूर्ण पुस्तके लिहिली. बृहज्जातक, बृहत् संहिता, पंचसिद्धांतिका. ह्या ग्रंथांना "ग्रंथरत्न" दर्जा आहे. अजून वराहमिहीर वर बरेच लिहिण्यासारखे आहे.
मुद्दा हा आहे की प्रा. श्याम मानव आपल्या भाषणात वराहमिहीर चा उल्लेख, होराशास्त्र वर अपौरुषेय उल्लेख करून वाळीत टाकले. काय इतका अभ्यास असणाऱ्या मानवांनी हेतूपुरस्सर "होराशास्त्र - वराहमिहीर" ह्यांच्यावर बोलणे टाळले. आणि त्यांनी सांगितले की गॅलिलिओ पत्रिका / कुंडली मांडायचा. त्याने इंग्लंडच्या राणीचा जवळचा नातेवाईक "ड्यु फर्डिनांड" ची कुंडली मांडली. कुंडली वरून सांगितले की तो दीर्घकाळ जगणार आहे. दुर्दैवाने ड्यु फर्डिनांड ह्याचे १५ दिवसात प्राणोत्क्रमण झाले. जाणत्यांकडून ड्यु फर्डिनांड चा मृत्यू आणि त्याची कुंडली ह्यावर उहापोह झाला. कुंडली बरोबर आहे. कुंडली हेच् सांगते कुंडली धारक दीर्घायुषी आहे. अशा वेळी जर मृत्यू झाला तर निष्कर्ष असा निघाला की "कुंडली आणि ग्रहगोलांचा मानवी जीवनावर परिणाम होत नसावा ही चर्चा सुरू झाली"
म्हणजे हिंदू संस्कृती मुद्दाम दुर्लक्षित करून पाश्चात्य थोटक्या ज्ञानाच्या आधारावर सभेला संमोहनात ठेवून लोकांच्या डोक्यात भ्रांती उत्पन्न करण्याचे काम प्रा. मानव करताहेत की काय असा संशय उत्पन्न होतो.
अशा निगेटिव्ह वृत्ती असणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने बागेश्वर बाबा - धीरेन्द्र शास्त्री ह्यांना आव्हान दिले. की त्यांची विद्या त्यांनी आमच्यासमोर प्रुव्ह करून दाखवावी. प्रा. मानव साहेब, ब्रम्हांडातून ज्याला आपण cosmos म्हणतो तिथून आलेली कृपा एवढ्या मोठ्या आकाशगंगेतून आपली सुर्यमाला, त्यामध्ये एवढी पिटुकली पृथ्वी, त्यात कणाचा सहस्त्रांश हिस्सा एवढे तुमचे घर आणि त्या घरात राहणारा वाट चुकलेला मानव. ह्याच्यासाठी का खर्च करावी? धीरेन्द्र शास्त्री चे एक आवडले बालाजी कडून एक दिवसाची सुट मागितली. सर्व मिडियाला मिडिया समोर नंगा केला. आणि सर्व आव्हानात्मक आव्हान पेलून सर्वांना गप्प केले. अगदी शांतीदूत स्त्री ची घरवापसी, ३०० ख्रिश्चन लोकांची घरवापसी केली. सर्वांची माफी पण मागितली की मिडियाला उत्तरे देत बसलो तर खरे कार्य राहुन जाईल. मानव साहेब ह्याला म्हणतात कार्याची आस आणि कार्याची धमक. हनुमानाचे - बालाजीचा आशिर्वाद धीरेंद्र शास्त्री ला असेल तर त्याच्या वाटेला जाऊ नका. अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या मागे शनी लागेल.
आजवर मानव साहेब चाळीस वर्षात किती घरवापसी तुम्ही केली? ख्रिश्चन आणि शांतीदूत धर्माचे किती अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने पकडून आणले? तुम्हाला हिंदू धर्म ग्रंथाचे वावडे. पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करणारी तुमची संस्था फक्त हिंदू विरोधी आहे असे म्हणण्यास पुर्ण वाव आहे. त्याचमुळे वाट चुकलेला मानव असे म्हणण्यास हरकत नाहीं.
कोणालाही दुखवायचा उद्देश मुळीच नाही. कोणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व.
©️भाई देवघरे
@sadetod
sadetod08@gmail.com
http://sadetod.com