प्रत्येकवेळी "दुरून डोंगर साजरे" असं म्हणुन चालणार नाही तर त्या डोंगराच्या थोडं जवळ जाऊन त्याला न्याहाळायलाही हवं त्याच्यावरील चढ उतार समजून घ्यायला हवेत,मग माणसाच्या बाबतीत पण असचं काहीस असतं,एखाद्याला पुर्णतः समजुन घ्यायचं असेल तर त्याच्यातील विसगंती शोधता यायला हव्यात, परतुं इतक्यावरच तो कळणार नाही तर मग त्याच्या जमेच्या बाजु आणि वैयक्तीक चाकोरी वजा करून शिल्लक राहीलेली सामाजीक चाकोरी समजुन घेता यायला हवी.मग तेव्हा कुठे तो आपल्याला थोडाफार कळेल,पण हा सारा तुलणात्मक पायंडा पाडत असताना 'माणुस' मात्र गमावता कामा नये ह्याचं भान राखलं की,समजायचं आपल्याला माणसं ओळखता येतात अन् ती जपताही येतात..!