नातं मैत्रिचं असो, प्रेमाचं असो, रक्ताचं असो किंवा मनाचं असो...
त्यात एकदुसऱ्या साठी care व respect असावी लागते...
Ego व attitude बाजुला ठेवावा लागतो...
कधी अनपेक्षीतपणे समोरच्याने आपल्याला दुखावलेच तर त्याचा फक्त स्वतःच्या दृष्टीने विचार न करता स्वतःला समोरील व्यक्तिच्या ठिकाणी ठेवून बघावे लागते. नाण्याला १ च बाजू नसते ना. आपण स्वतःला स्वतःमध्येच ईतकं कोंडून घेतो की, काहीवेळा इतरांचे दृष्टीकोन दिसत नाहीत आपल्याला. चुका सगळ्यांकडून होतात... ज्याच्याकडून काही चुक झाली नाही असा ईथे कोण आहे... समोरच्याने चुक मुद्दाम केली आहे की परिस्थिती मुळे चुकली ती व्यक्ती हे तपासणे ही आवश्यक आहे.
व्यक्ती तितक्या प्रकृती... मग प्रत्येकाचे मतं व स्वभाव जुळणं तर अशक्यच आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन ही वेगळा असणार...
समोरच्याने आपल्याला योग्य वाटेल असंच वागावं ही अपेक्षा तर अयोग्यच ठरणार ना.
त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याचे सद्गुण बघुन त्याला स्विकारतो ( मग ते फक्त माणुसकी म्हणुन का असेना ) त्याच वेळी समोरच्याचे दुर्गुण ही स्विकारायला हवे. काही खटकलं तर स्पष्ट बोलून गैरसमज दुर करावेत, स्वतःचे व समोरच्याचे ही आणि त्याच बरोबर त्या व्यक्तीच्या चुका दुर करायचा प्रयत्न करावा, त्या व्यक्तीला दुर करू नये...
मनुष्य म्हणजे काही देव नाहीये मनातलं ओळखायला. वेळ लागतो व समजण्याचा प्रयत्न केला तरी शक्य होत नाही काहीवेळा परिस्थितीमुळे.
फक्त रक्ताचीच नाती महत्त्वाची नसतात... त्यापलीकडे ही बघायला हवं...