कितीदा रडूनी जीवाने हसावे
किती द्या नव्याने तुला बघावे
साथ तुझी असण्याची जीवनाची ही कहाणी
सोबत तू असावे अशी आस माझी
डोळ्यातले अश्रू कितीदा बघावे
तू असा ओळखीचा पण अनोळखी का दाखवावे
कितीदा तुला स्वप्नात बघावे
जवळ असूनही दुरावा का दाखवावे
स्वप्न चालून कितीदा नव्याने बोलवावे
सांगना तुझ्या आठवणीतल्या
पसारांना कितीदा बघावे
अंजली वडुरकर