Bluepad | Bluepad
Bluepad
जगद विख्यात नाथ संप्रदायातील समर्थ सद्गुरु संत अवजीनाथ महाराज
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
24th Jan, 2023

Share

*जगद विख्यात नाथ संप्रदायातील समर्थ सद्गुरु संत अवजीनाथ महाराज*
महाराष्ट्र हि पवित्र आणि पुण्यभूमी असुन याभुमित अनेक महान विभूती संतांचा जन्म झाला आणि त्यांच्या कार्याने पुणीत झालेला प्रदेश तीर्थक्षेत्र म्हणून उदयास आला . जगाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी, जगतगुरु तुकाराम महाराज देहु,संत मुक्ताबाई मुक्ताईनगर, श्री गजानन महाराज,शेगाव, सद्गुरु साईबाबा शिर्डी, सद्गुरु स्वामी समर्थ अक्कलकोट, संत एकनाथ महाराज पैठण,संत भगवान बाबा, सद्गुरु वामन भाऊ, महाराज गहिनीनाथ गड सद्गुरु समर्थ अवजीनाथ महाराज मिरपूर लोहारे अशी अनेक तीर्थ क्षेत्र आहेत कि ज्याठिकाणी त्या त्या काळातील संतांच्या कार्याचा आणि अद्भुत सामर्थ्याचा ठसा उमटलेला आहे.परंतु या पैकी बरीच तीर्थ क्षेत्र आजही शासकिय विकासाच्या योजानापासुन वंचित आहेत.असच विकास पासुन वंचित पण अद्भुत शक्तिपीठ असणाऱ्या नवनाथ भक्ति संप्रदायातील महान विभूती समर्थ सद्गुरू संत अवजीनाथ महाराज यांच्या दर्शनाचा योगायोग आज लाभला . जगद विख्यात नाथ संप्रदाय आणि याच संप्रदायातील समर्थ अवजीनाथ महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुणित झालेल मिरपूर लोहारे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सद्गुरू अवजीनाथ महाराज यांची प्राचीन काळातील संजीवन समाधी आहे.जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संतांचा जन्म हा मुळात लोक कल्याण करण्यासाठी झालेला असतो. संतांची कधीच तुलना करता येत नसते. तुलनात्मक दृष्टी हा संत परंपरेचा भाग नाही. करण संत हे कधीच तुलनात्मक नसतात तर ते अनंत असतात. ज्या त्या कालखंडातील संतांचं योगदान कार्य तुलने हे पलिकडे असतं ‌.महणुन त्या त्या कालखंडातील संतच कार्य त्या कालंखडासाठी आणि भविष्यकाळ साठी दिशादर्शक असतंच.आपण संत कार्य शिकवणं पाहिली .संताची शिकवणं हि मानवी धर्म आणि मुल्य संस्कार आणि संस्कृती मजबूत करण्यासाठी असते . आत्मा ते परमात्मा हा प्रवास सुलभ करण्यासाठी संत असतात मोक्षाच गाठोड सोड बांध करतं करत सर्वसामान्य जनांना दुःखाच्या ओझयाखालुन मोकळं करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात तसेच ज्ञान प्रभावाने व प्राप्त अद्भुत शक्तीने त्या काळात अनेक कार्य लोक उपयोगी संत करतात पण हि दिव्य शक्ति असते त्याचा तो प्रभाव असतो .पण सर्वसामान्य लोकांना हा चमत्कार वाटतो .हा चमत्कार नसुन दिव्य सिद्धी प्राप्ति चा प्रभाव असतो . आणि या शक्तिचा उपयोग संत लोक कल्याण करण्यासाठी समर्पित भावनेने करतात . असेच अनेक प्रभावी लोक कल्याणकारी कार्य समर्थ सद्गुरु अवजीनाथ महाराज यांच्या कार्यकाळात झाले आणि याच ठिकाणी संजीवन समाधी परिसरात हि दिव्य शक्ती आजही टिकून आहे .याचा प्रत्यय येण्यासाठी श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे. संसारीक दुःख मोह माया हि ज्ञान मुळे कमी होत जाते.महणुन संत हे ज्ञानाचे सुमधुर अमृत धार असतात आणि हि संत परंपरा महाराष्ट्राला लाभली हे आपलं भाग्य आहे. सृष्टी वर संसारीक भव दुःख हरण करून सुखाचा भक्ती मार्गा दाखविण्यात जगद विख्यात नाथ संप्रदायाच खुप मोठं योगदान आहे .आणि याच नाथ संप्रदायातील परंपरेत सद्गुरू श्री दत्त गुरु यांच्या शिष्य परंपरेत सद्गुरू मच्छिंद्रनाथ, सद्गुरू गोरक्षनाथ ते थेट संत ज्ञानेश्वर महाराज मधल्या काळात संत अवजीनाथ महाराज आणि आता अलीकडे सद्गुरू वामनाभाऊ महाराज ते राष्ट्र संत भगवान बाबा हि नाथ संप्रदायातील परंपर आणि याच परंपरेतील सिद्ध पुरूष (सिद्ध पुरुष म्हणजे ज्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या )महान विभूती अदभुत सामर्थ्य असणारे लोक कल्याणकारी मार्ग जोपासताना अहिंसेची शिकवणं जगाला देताना भक्ति शक्ति मार्गाचा अवलंब करत लोकहिताचे उपदेश करताना कृतीशील मार्गाने समाज उत्थानाकडे हा प्रवास ज्या त्या कालखंडातील थोर विभूती संतांनी केला . वास्तविक संत हे जातीधर्माच्या पलिकडे राष्ट्र साठी समर्पित असतात पण योगायोगाने ज्या समाजात त्या त्या कालखंडातील संतांचा जन्म झाला त्या समाजाने तरी नक्कीच आपल्या संतांनी दिलेली शिकवण पुढे घेऊन जाण्यासाठी आणि स्वतः आचरण करण्याची आवश्यकता आहे. समर्थ सद्गुरु अवजीनाथ महाराज यांचा सुद्धा वंजारी समाजातील संगमनेर तालुक्यातील गोरे कुटुंबात झाला हा मोठा भाग्याचा क्षण आहे.अगदी लहान वयात नाथांचा अनुग्रह झाला आणि संत ज्ञानेश्वर माऊली प्रमाणे समर्थ सद्गुरु अवजीनाथ महाराज यांनी मिरपूर लोहारे तालुका संगमनेर येथे संजीवन समाधी घेतली. या ठिकाणी विविध विकास योजना व्हाव्यात व या पवित्र तीर्थक्षेत्र ठिकाणाचा उत्तर उत्तर विकास झाला पाहिजे या साठी संत अवजीनाथ महाराज ट्रस्ट मिरपुर लोहारे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ करपे व संचालक मंडळ तथा समस्त ग्रामस्थ मिरपूर लोहारे हे प्रयत्नशील आहेत .हिच भावना राज्यातील इतर भाविक व शासना पर्यंत पोहोचली पाहिजे . माध्यम कोणिही असेल पवित्र तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नशील असल पाहिजे
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad