Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ ....
विश्वास बीडकर
24th Jan, 2023

Share

शुभ मंगळवार .
हायवेवर वाहनांसाठी तिन लेन्स असतात .
तशाच , पैशांच्या बाबतीत ही असतात बहुधा .
पहिली लेन , पैसा मिळविण्यासाठी . दुसरी पैसा साठवण्याची आणि तिसरी खर्च करण्याची .
पहिल्या लेन मध्ये राहायला सगळ्यांनाच आवडेल .
" पैसा मिळवणं आवडतं मला ."
असं म्हणणं म्हणजे ,
" श्वास घेणं आवडतं मला " असं चं आहे . अनिवार्य आहे चं ते .
दुसरया लेन मध्ये पैसा साठवणं . ह्यात दोन अर्ध्या लेन आहेत . एक पैसा साठवण्याची आणि दुसरी पैसा वाचवण्याची .
तिसरी आहे ती खर्च करण्याची लेन .
" पैसा तो कोई भी कमा सकता है खर्चा करनेको स्टाईल चाहिए ." हा सिनेमात टाळ्या घेणारा संवाद असतो . तिसरया लेन मध्ये या स्वभावाची माणसांची गर्दी असते .
खिशात , पाकिटात , बॅंकेत पैसा जास्त काळ राहणं यांना आवडतं नसतं .
" करूया मस्त मजा . होऊ दे पैसा वजा ." हे यांचं धोरण . इकॉनॉमी चालते ती यांच्या मुळे .
गोंधळून जातात ती मधल्या लेन मधली माणसं . पैसा साठवतांना आधी हे लोक पैसा वाचवायला शिकतात . खरं ही आहे ते . वाचवल्याशिवाय साठवणार कसा . पण ह्यातच मोठी गफलत होते .
एकदा वाचवायची सवय लागली की खर्चाच्या लेन मध्ये गाडी चालवावी चं वाटतं नाही . तो वेग सहन होत नाही अशा व्यक्तींना . मग उरतो तो पैसा साठविण्याचा आनंद .
पास बुक , फिक्स डिपॉझिट्स आणि पोर्ट फोलिओ हेच यांचे आनंदसागर होतात .
" पुढच्या वर्षापासून पैसा खर्च करणार " असं ही मंडळी दर वर्षी ठरवतात . पण त्यांच्या कॅलेंडर मध्ये बारा ही पानं साठवण्याची चं राहतात .
अशा वेळेस मला ' जिंदगी मिले ना दोबारा ' या सिनेमातल्या संवादाची आठवण होते ....
" तुला खात्री आहे का पंच्चेचाळीस वर्ष जगण्याची ."
या तिन्ही लेन मधून योग्य वेगाने प्रवास करत आयुष्य आनंदाने व्यतीत करणं हेच मर्म !
उमगलं पाहिजे या जन्मी ...
विश्वास बीडकर .
२४ जानेवारी २०२३ .

0 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad