कसा होता आठवेना चेहरा तिचा
बदलला आहे तिने चेहरा तिचा
आरशाला जाब मी जेव्हा विचारला
झाकून ठेवला त्याने चेहरा तिचा
उगा नादावलो,वेडावलो कसा मी?
विसरलो बरे झाले चेहरा तिचा
तशी ती देखणी होती, सुंदर होती
मुखवटाच भासला चेहरा तिचा
नको कुणाच्या चेह-यावर भाळणे
पाहणार नाही कधी चेहरा तिचा
@श्रीधर कुलकर्णी कळंब