Bluepad | Bluepad
Bluepad
नशीब
SailGavhane
SailGavhane
23rd Jan, 2023

Share

आपलं नशीब किती विचित्र असतं ना. जेव्हा आपण म्हणतो की मला माझ्या नशीबाने या वेळेस साथ दिली पाहिजे त्याच वेळी कधी नशीब साथ देत नाही.कारण आपण त्या वेळी मेंदू आणि मन या दोन्ही तर गुंतलेले असतो. आपण हट्टाहास करतो की हा हेच माझं नशीब आणि हेमलता साथ देईल.पण ते मात्र देत नसतं. मग आपण म्हणतो नशीब फुटकच ये आपलं कधीच साथ देत नाही.नशीब नसतचं..
पण मग दुसऱ्या वेळी मात्र नशीब एकदम हवं तसं साथ देत. पण या वेळी मेंदू आपल्या नशिबात नसतो.या वेळी साथ फक्त मनाची असते. मनाला वाटलं तसं घडतं ना. पण या वेळी हट्टहास नसतो की घडलच पाहिजे ,पण एक मनाची भावना सांगते आमी तसंच घडतं.
हा मला आलेला स्वताच्या अनुभव आहे...
कदाचित तुमचे विचार वेगळे. मी फक्त मला अनुभव आलेला सांगतोय. मला काय वाटत माहिती का..
जर तुम्हाला आपलं नशीब आपली साथ द्यावी असं विकत असेल ना तर जे काम करतात त्याला शंभर टक्के आपलं माना मेंदू पासुन काम करा त्यात यश मिळणार हे मनापासून ठरवा आणि काम करा. जर तुम्ही अचानक स्वताला म्हणता इथं माझ्या नशीबाने साथ दिली पाहिजे.पण असं न करता तुम्ही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा . माझं मन सांगतोय मी यशस्वी आहे.आणी माझा मेंदू सांगतोय मी शेवट पर्यंत प्रयन्य करणार ये मला माझ्या नशीबाने नाही साथ दिली तरी माझे प्रयत्न मला साथ देणार ये आणि यशस्वी बनवणार ये.

1 

Share


SailGavhane
Written by
SailGavhane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad