सांग देवा माझं काय चुकलं त्याने तिचा वर कसलीही अपेक्षा न ठेवता खूप प्रेम करावे आणि तिने त्याने कानाडोळा करावे
कारण तीला त्याचे काहीच वाटत नसावे सांग देवा माझं काय चुकलं त्या प्रेम पोटी त्याने तिची कसलीही अपेक्षा न ठेवता खुप काळजी करावी आणि त्या काळजी पोटी त्याने तिला एखादी गोष्ट सांगावी
तिने ठेवा तुमच्याजवळच असे म्हणावे आणि बोलणंच सोडून द्यावे कारण तिला त्याचं काहीच वाटत नसावं, सांग देवा माझं काय चुकलं श्रद्धा मर्डर सारख्या गोष्टी आजच्या कळयुगात घडत असताना त्याला तिची वाटणारी काळजी तिला आवडू नये आणि तिनं बोलणंच सोडुन द्यावं कारण तिला त्याचं काहीच वाटत नसावं सांग देवा माझं काय चुकलं मी सांगितलेली गोष्ट तिच्यावर बंधनकारक नव्हती म्हणून मी रोज तिची क्षमा मागावी देवा इतक्या दिवसांत तुला पाझर फुटला असता पण तिला नाही फुटला सांग माझं काय चुकलं मग प्रेमाची व्याख्या जर अशी असेल तर सांग देवा माझं काय चुकलं, चुकलं तुझंच देवा कारण तुच या शब्दाचा आणि भावनेचा निर्माता