Bluepad | Bluepad
Bluepad
कर्म शुद्ध तरच सारं चांगले .
 Ghanshyam L Sangidwar
Ghanshyam L Sangidwar
23rd Jan, 2023

Share

जिवनात अनेक प्रकारचे विचार , अनेक प्रकारची माणसं , अनेक अनुभव , अनेक प्रसंग घटना होत असतात . अनेकदा अनेक विचारा तुन काही नाविन्य निर्माण करण्याचे विचार येतात . परंतु आर्थिक बाजुचा विचार करता ते विचार तिथेच संपतात . अनेकदा मदतीच्या संदर्भात अनेक लोक भेटतात . त्यांना मदत करावी कि करु नये हा सदविचार असला तरी या बाबतीतही आपण अपुर्ण आहोत . संपुर्ण नाही . कारण काय तर मदत म्हणजे सहकार्य नाही. आणि अशी मदत केवळ आपल्या लोकांना देता येते . परंतु खरी मदत म्हणजे आर्थिक सहकार्य आणि आर्थिक सहकार्य हे गरजु लोकांसाठी असते . मग प्रश्न निर्माण होतो गरजु कोण ? रस्त्यावर भिक मागणारे गरजु आहेत का . ते सुद्धा व्यावसायीक भिकारी आहेत . काही पारंपरिक भिकारी आहेत . काही केवळ कामाचा कंटाळा आळस त्रास यासाठी भिक मागतात मग अशांनी भिक मागायचा का . या संदर्भात जेवढं विचार केला तेवढं तोडका . मदत ही गरजवंताना केली तरी आपण तेवढं सक्षम नाही . आजकाल तर लहान मुलांना पळवून त्यांना शहरात चौकाचौकात भिक मागणारी लहान लहान मुलं गाड्या थांबल्या की ज्या होतात . लहान मुलं म्हणुन दया दाखविले तर हेच भिकारी लहान मुलांना पळवून , मुलांचे चोरी करतात . प्रसंगी व्यवसाय किडनी चोर यास्तव विकली जातात . म्हणून याला सुध्दा विरोध आणि भिक घालणे बंद हा तेवढाच महत्त्वपूर्ण निर्णय एकंदरींत भिक मागणं ही प्रथा वाईटच .अशा प्रथा बंद व्हायलाच पाहिजे . तसही विकसीत देशाला अशोभनीयच . जर. आपण मदतीचाच विचार केला तर संपुर्ण देशात मदत देणं हे प्रत्येकाला झेपणारे नाही . परंतु आपण एक काम करू शकतो आपल्या जवळपास असणारे दिसनार्यांना मदत दिली तर ही मदत पृथ्वीवरील एका कोपरयात आपण प्रकाश निर्माण केल्याचा आनंद नक्कीच मिळेल . मदत देणं मदत करणं मदत घेणं ही नैतिकता असली तरी , भिक घालणं भिक मागणं हे. देशासाठी अनैतिकता च आहे . अर्थात भिक हे अनेक प्रकारांची असु शकते . आपण कोणती भिक अनैतिक ते ठरवु शकतो . . प्रामाणिकपणा मुळे जिवनात हार कधीच येत नाही . आनंदानी जगण्याचा अलौकिक प्रकार वाढवितात . सांभाळून ठेवलेल्या वस्तू , काळजी पूर्वक ऐकलेली माहीती . आज ना उद्या कधी ना कधी कामात येतातच . जर मनगटात ताकद असेल तर उद्दिष्टे यशस्वी होतातच पण. आणि मनात प्रेम असेल तर आपले सुध्दा दुर नसतात . काय फरक पडतोय कोण काय विचार करतो . कोन बाजुंनी आहेत . किंवा कोन. विरोधात आहेत . आणि साथ ज्यांची असते त्यांचे कौतुक जेवढं केलं तेवढं कमीच.‌अशासाठी कृतज्ञता श्रेष्ठ . लो , क्रोध राग नफरत गुस्सा हे सारं शरीरातील विष आहेत ते आपण स्वताच हळूहळू सेवन ‌करीत असतो . आणि विचार करीत असतो .परंतु मृत्यू हा इतर कोणाचा तरी होत असतो . जगात वाईटाचा अंत यासाठी होत नाही , वाईटांची संख्या वाढते यासाठी नाही , वाईट सहन करणार्यांची संख्या वाढते आहे . असेच भिकेच्या बाबतीत आहे . जर आपण स्वताच मजबुर ऐवजी मजबूत असलं , निर्बल ऐवजी सबल असलं . कायर ऐवजी हिम्मतवान तर जगातील कोणतीही शक्ती आपणास पराजित करु शकत नाही . जग भिक मागणारर्याना यांना विचारत नाही , कमजोर आहेत त्यांना विचारतं नाही . तर जे सन्मानानी जगतात त्यांनाच विचारते . हे तेव्हाच शक्य आहे जर अहंकार शुन्य आणि कर्म शुद्ध असेल तरच .
*
 कर्म शुद्ध तरच सारं  चांगले .

0 

Share


 Ghanshyam L Sangidwar
Written by
Ghanshyam L Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad