Bluepad | Bluepad
Bluepad
पा.घ.पा.
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
23rd Jan, 2023

Share

गझल पा.घ.पा.
जिथे रुजणार नाही प्रेम
त्यांना काय म्हणूनी भेटावे ?
पालथ्या घड्यावर पाणी
काय म्हणूनी मी ओतावे ?...१
कळे ना ज्यांना भाव मनातले
त्यांना काय म्हणूनी मी सांगावे ?
झोपीस जागविता येते जगी
सोंग घेणाऱ्यास कसे जागवावे ?...२
कळे न प्रीत ज्याला जगी
कितीदा मनधरणी मी करावे ?
हातचे सोडूनी शहाण्याने जगी
पळत्या मागे कशास धावावे ? ..३
कवि अटलविलास

0 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad