आईसकांडीवाले...😂
✍️"आज हे चित्र पाहिलं आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.. खरंच लहानपणी या दिवसात असाच एक व्यक्ती गावात यायचा आणि जोरात आवाज करायचा? आईसकांडीवाले 😄😂लवा,लोखंड, टप्पर, टुप्पर भंगार घेवून यारे... 😂आईस्कॅन्डीवाला आला.. 😂😂आणि हा आवाज ऐकून घरातील सगळी पोरं आईने दिलेला रुपया घेऊन त्याच्याजवळ जायचे.आणि मग तो मस्त एक रंगीत आईसकांडी द्यायचा.. खरं सांगायचं तर ती 1रुपयाची आईसकांडी खाण्यात खूप आनंद होता.. खूप मजा यायची. घरात आम्ही भंगार फेकून देत नसायचो.कधी कधी भंगारवाला पण यायचा तो म्हणायचा
"लवा,लोखंड,टप्पर,टुप्पर भंगारवाले.. 😂😂हे मात्र तो एखाद्या गाण्यासारखं तालासुरात म्हणायचा.. याच आम्हाला खूप हसू यायच 😂😂पण बिचारा भंगारवाला आणि आईसकांडीला दोघेही गरीब होते. त्यांना पोटापाण्यासाठी हे करावं लागत होतं.. त्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटतं नव्हता..कारण या जगात पोट भरायच असेल, तर माणसाने कोणतंही काम करण्यास लाजू नये..आईसकांडीमधून मिळणाऱ्या 200/300रुपयात आईसकांडीवाला त्याच पोट भरायचा.. आणि एक रुपयाची कांडीत आमच पोट भरायच..खरंच किती सुंदर होतं ते बालपण 😍😍
लेखन -: साक्षी पवार यवतमाळ
(माझ्या डायरीमधून..)
(लहानपणीच्या आठवणी)