Bluepad | Bluepad
Bluepad
बाजार.
SD
SD
23rd Jan, 2023

Share

बाजार
बाजार म्हणजेच मार्केट शब्द ऐकले की आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते.गरजेचे नाही सर्वांचे चित्र सारखे असेल.
भरपूर वस्तू आणि सोईसुविधा खरेदीविक्री साठी उपलब्ध आलेले ठिकाण म्हणजे बाजार - थोडक्यात असेच काहीसे वर्णन करता येईल बाजाराचे आणि त्याच्या चित्राचे. पण बाजार हा शब्द एवढासा मर्यादित आहे का ?
आजच्या या स्पर्धेच्या , धावपळीच्या जीवनात आपण भरपूर गोष्टींची सरमिसळ केली आहे .नात्यांचा सुद्धा बाजार मांडलेला काही ठिकाणी दिसतो. निस्वार्थ , निखळ मैत्री आणि इतर नातेही आजकाल विलुप्त होणाऱ्या जमाती प्रमाणे झाली आहे.
तसा आपला संबंध बाजाराशी जन्मापासून असतो पण ते कळायला आपल्याला उशीर होतो. आपला जन्म कोणत्या रुग्णालयात व्हावा हे आपल्या पालकांच्या बजेट वर अवलंबून असते.
चांगल्या आणि अद्यावत सोईसुविधा असलेले रुग्णालय सर्वसामान्यांना मोठ्या कष्टाने आणि नशिबानेच मिळते.
थोडे मोठे झाल्यावर आपण कोणत्या शाळेत जावे हा यक्षप्रश्न आपल्या पालकांसमोर उभा राहतो. सध्याच्या काळात शिक्षणाचे झालेले बाजारीकरण आपल्याला नवीन राहिलेले नाही.त्याहून पुढची बाजारपेठ आहे महाविद्यालयीन शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रम.
त्यात स्पर्धेच्या नावाने पैश्यांचा महापूर लोटला आहे. ते सामन्याच्या दृष्टीने एक वेगळे जग असल्यासारखे भासते.
कसेतरी शिक्षणाच्या बाजारातून सुटका झाल्यावर नोकरी आणि व्यवसाय नावाच्या बाजारात आपली एन्ट्री होते.
नोकरी आणि व्यवसायाच्या बाजारात आपले अस्तित्व सिद्ध करण्याआधी आपली नौका गोते खाऊ लागते. कारण कुठे व्यावसायिक पदवीचे भांडवल लागते तर कुठे आपल्या शिक्षणाचा काही उपयोग आहे का याचा शोध घेण्याची वेळ येते. याच बाजारात काहीजण पैशांचे वजन दाखवून सहज नोकरी अथवा व्यवसायाचा परवाना मिळवतात. तर कोणी कमवयच्या वयात स्पर्धा परीक्षा या आणखी एका बाजाराच्या चक्रव्यूहात अडकतो. काही भामटे सामन्याच्या याच गोंधळाचा फायदा घेऊन त्यांना नोकरीचे आमिष दाखवून लुबडतात.
या जन्म मृत्यूच्या प्रवासात आपली बाजारातून सुटका होत नाहीच. नोकरीचा टप्पा पार केल्यावर सुरू होते नवीन बाजाराची प्रकिया - लग्न नावाच्या बाजाराची . काही वेळेस असे वाटते की या बाजारात फक्त ऑफिसियली बोली लागायची बाकी आहे .
लग्न झाल्यावर मुले होतात आणि पुन्हा हेच चक्र पुनः सुरू होते.
न थांबणारे बाजाराचे चक्र.
व्यवहार खरेदी विक्रीचा , किंमत येथे वेळ ठरवते.
एस. डी.

1 

Share


SD
Written by
SD

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad