Bluepad | Bluepad
Bluepad
भगवंताशी एकरुप झाल्यासच भगवत शक्ती कार्य करते .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
23rd Jan, 2023

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏
भगवंत सर्व प्राणीमात्रांचे हितच करत असतो . भगवंताची शक्तीसुध्दा निरंतर प्राणीमात्रांच्या हिताविषयी कार्यरत असते .
TV चॅनेल वरील कार्यक्रम हे जसे रिमोटने त्याच चॅनेलशी कनेक्ट करावे लागतात . तेव्हाच तो कार्यक्रम पाहता येतो . त्यासाठी जी प्रणाली असते ती आपणास दिसत नाही पण तरीही त्या प्रणालीनेच कार्य होत आहे हे पाहतो .
खरा भक्त जेव्हा स्वार्थ त्याग करुन केवळ जगत कल्याणासाठी संपूर्ण कर्म करतो तेव्हाच त्या जगत व्यापक सर्वव्यापी व हितकारक शक्तीशी एकरुप होतो .आणि त्याच्या कार्यात विलक्षणता येते . ही एकरुपता झाल्यानेच भगवंताची शक्तीच काम करते आणि त्या शक्ती कडूनच लोकांचे हित होत असते . अशा व्यक्तीला कर्तव्यात बाधा येत नाही आणि परिश्रमाचा अनुभव होत नाही .( वैयक्तीक वा एखाद्या समुहाचे हित नाही हे लक्षात घ्या )
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो !
🙏श्रीकृष्ण सावरगांवकर
२०/०१/२०२३
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
भगवंताशी एकरुप झाल्यासच भगवत शक्ती कार्य करते .

2 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad