Bluepad | Bluepad
Bluepad
आपले कुलधर्म कुलाचार केलेच पाहिजेत .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
23rd Jan, 2023

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 ईश्वरी तत्त्व आत्मसात करण्यासाठी भक्ती करावयाची . आज या ईश्वरी तत्वाचा अभाव आहे तर भक्ती कशी होणार .
अनेक पंथ , उपासना पद्धती , विविध देव देवता यांना पर्याय म्हणून तथाकथित दिक्षा गुरु एका ठराविक देवाची उपासना ग्रंथ , पादुका यांचीच भक्ति सांगतात व करतात . यांच्या नादाने लोक आपले कुलदेवी देवता यांची उपासना , कुलाचार सोडून दिलेत . त्याचा परिपाक म्हणून अविवाहीत , व्यंग , घटस्फोट , वंशक्षय इ. दोष उत्पन्न होत आहेत .
वास्तविक पाहता कुलदेवतेची केलेली उपासना दत्तप्रभूंना पोहचते असे त्यांनी स्वतः सांगीतले आहे . तरी सुद्धा चुकिचा मार्ग सांगून दत्त महाराज वा स्वामीची पूजा उपासना करा कुलदेवता, कुलधर्म करु नका असे सांगतात . काहीही झाले तरी आपले कुलधर्म कुलाचार हे केलेच पाहिजेत . ज्याचे जे दैवत असेल ते ते पूजलेच पाहिजेत . कोणाचा म्हसोबा , कोणचा रोकडोबा ते ते पूजलेच पाहिजेत . फक्त त्यातील चुकीच्या अयोग्य प्रथा टाळा . दुसऱ्या कुणी सांगितलं म्हणून दुस-याचे देव पूजू नका . खोट्या गोष्टी टाळा . सत्य जाणा ' आपल्या आपले दैवत बदलू नका , उपासना बदलू नका . दुस-याच्या पण बदलू नका .
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो !
🙏श्रीकृष्ण सावरगांवकर
२१/०१/२०२३
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
आपले कुलधर्म कुलाचार केलेच पाहिजेत .

0 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad