कर्म योगात जी प्राप्त परिस्थिती आहे त्यातच आचरण करायचे आहे . प्रसंगानुसार सहाय्य करणे म्हणजे सेवा होय . बंद गाडीला धक्का देण्यासाठी प्रयत्न करणे सेवा आहे , अपघातग्रस्तांना दवाखान्यात नेणे . त्यांना खाऊ घालणे हि सेवा . जाणून बुजून सेवा करतो ती सेवा नव्हे . कारण उद्देश पारमार्थिन न राहता लौकिक राहतो . परिस्थिती न बदलता परिस्थितीचा सदुपयोग करणे महत्वाचे . प्राप्त परिस्थितीत सेवा सदुपयोग करणेच भक्ती आहे .