#नेताजी_सुभाषचंद्र_बोस_जयंती
आज 23 जानेवारी... भारतमातेचे थोर सुपूत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती.... त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.. 🙏महात्मा गांधीजींच्या अहिंसक मार्गाने भारताला इंग्रजांकडुन स्वातंत्र्य मिळणे सहजसाध्य नाही... त्यासाठी वेळप्रसंगी रक्त सांडावे लागेल, ही भुमिका घेऊन त्यांनी काँग्रेसचा त्याग करुन वेगळा मार्ग स्वीकारला....नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरोधात लढण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंग्रजांच्या विरोधात असलेल्या जपानच्या सहकार्याने "आझाद हिंद सेना" स्थापन केली.... "आझाद हिंद बँक" स्थापन केली.... स्वतंत्र भारताची घोषणा करुन सरकार स्थापन केले..... इंग्रजी सत्तेला खाली खेचण्यासाठी आझाद हिंद सेनेला "चलो दिल्ली" हा आदेश दिला.... "जय हिंद" चा नारा दिला !! .....इंग्रजांच्या प्रबळ सत्तेच्या विरुद्ध त्यांनी केलेला अजोड संग्राम सर्व भारतीयांना आजही प्रेरणा देतो आहे .... दुर्दम्य इच्छाशक्ती, शौर्य, धाडस, जाज्वल्य राष्ट्रप्रेम, कुशाग्र बुध्दीमत्ता, वैचारिक सुस्पष्टता, संघटन, नेतृत्व, प्रचंड आत्मविश्वास, तसेच बेडर आणि कणखरपणा ही त्यांची विशेष गुणवैशिष्ट्ये होती... त्यांच्या तेजस्वी विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत.... त्याची ही झलक...
¶तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा..!
¶आजादी मिलती है नहीं है, हासिल की जाती है…!
¶याद रखो कि अन्याय और गलत चीजों से समझोता करना सबसे बडा अपराध है...!
¶
¶केवल चर्चाओंसे इतिहास में कभी वास्तविक बदलाव नहीं आ सकता..... बदलाव के लिये संघर्ष करना पडता है !
¶भारत के भाग्य को लेकर आप कभी निराश न होना.... क्योंकी दुनिया में ऐसी कोई ताकत नहीं है जो भारत को गुलाम बनाकर रख सके, भारत आजाद होगा और जल्द ही होगा... !
¶आपला मार्ग भलेही कठीण आणि खडतर असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरी पुढे गेलंच पाहिजे.
¶यशाचा दिवस हे दूर असेल पण तो येईलच हे मात्र नक्की.
¶राष्ट्रवाद हा मानवजातीच्या उच्चतम आदर्श सत्य, शिव आणि सुंदरतेने प्रेरित आहे.
¶आपल्याला केवळ कार्य करण्याचा अधिकार आहे. कर्म हेच आपलं कर्तव्य आहे. कर्माच्या फळाचा स्वामी हा सर्व शक्तीमान नियंता आहे, आपण नाही.
¶श्रध्देचा अभाव हे सर्व दु:खांचं मूळ आहे आणि तडजोड ही सर्व दुःखाचे मुळ आहे.
¶आपल्या देशातील प्रमुख समस्या गरिबी, निरक्षरता, रोगराई, कार्यक्षम उत्पादन आणि वितरण या फक्त समाजवादी पद्धतीने सोडवता येतील, याबाबत माझ्या मनात काहीच शंका नाही.
¶जर तुमच्यावर शत्रूपुढे प्राप्त परिस्थितीत क्षणकाल झुकावे लागले तरी शुर आणि स्वाभिमानी वीरांप्रमाणे झुका, पराभूत म्हणून नव्हे .... कारण त्यावेळी विजय थोड्या अंतरावर आलेला असतो.
¶अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या भारत मातेच्या या थोर सुपूत्राच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐 💐 💐
¶श्री उत्तमराव निर्मळ
सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता
जलसंपदा विभाग व परिवार