Bluepad | Bluepad
Bluepad
mi aani aaine मिळुन बनवलेले ॲप
N
Nandkishor Dhekane
23rd Jan, 2023

Share

मी आणि आईने मिळून बनवलेले ॲप
[11/01, 18:53] नंदकिशोर अरविंद ढेकणे: [10/01, 18:14] नंदकिशोर अरविंद ढेकणे: अँप लिंक : https://dev-dhaarmiksite.pantheonsite.io/
कुळधर्म म्हणजे आपल्या घराण्यात चालत आलेल्या चालीरीती. प्रत्येकाच्या घरात देव देवतांच्या मूर्ती असतात.
त्या त्या देवतेचा सण व उत्सव असतो तो साजरा करणे म्हणजेच कुलधर्म होय. कुळाचार म्हणजे सण व
उत्सव साजरा करण्याची प्रत्येक घराण्याची पद्धत असे ढोबळपणे म्हणावे लागेल. मध्यंतरी माझ्या आईच्या
मनात आपले हे संस्कार कुळधर्म आणि कुळाचार आहेत ह्यावर एक मोबाईल अँप्लिकेशन बनवावे हा
विचार आला तिने आपला हा विचार माझ्याजवळ बोलून दाखवला. मला ही कोंसेप्ट खूप आवडली
म्हणून मी हे मोबाईल अँप बनवण्याचा निर्णय घेतला व ह्या कॉन्सप्टवर काम करण्यास सुरवात केली .
हे अँप कसे तयार करता येईल ह्या विवनचनेत असताना माझ्या वाचनात कुळधर्म आणि कुळाचार
हे पुस्तक आले . ह्या पुस्तकावरून हे अँप तयार करण्याची कल्पना मला सुचली. आज कित्येक
दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर हे अँप मी आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. हे सर्व माझ्या
आईमुळेच शक्य झाले. तिने मला हे अँप बनविण्यासाठी प्रेरित केले.
[10/01, 18:14] नंदकिशोर अरविंद ढेकणे: आपल्या भारत देशात विविध सण व उत्सव साजरे केले जातात. विशेष करून आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी संतांची
परंपरा लाभली आहे . आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक घराण्याचे कुलदेवता व कुलदैवत असते. पण आजच्या तरुण पिढीला
कुळधर्म आणि कुळाचार म्हजे काय हे माहित नसते. कारण आजकाल नवरा बायको दोघेहीजण व्यवसाय निमित्त
घराबाहेर असतात. त्यांना आपले कुळधर्म आणि कुळाचार म्हणजे काय हे माहिती नसणे अपेक्षित आहे. आपल्या
पूर्वजांपासून चालत आलेले हे कुळधर्म आणि कुळाचार आपल्या सर्वाना माहिती व्हावेत म्हणून आम्ही ह्या खास
मोबाईल ऍप्लिकेशनची निर्मिती करत आहोत. ह्या अँप मुळे आपल्या भावी पिढीला कुळधर्म आणि कुळाचार ह्यांची
माहिती तरी होईल. कुळधर्म आणि कुळाचार मुळे आपल्यावर चांगले संस्कार होऊन एक चांगली अशी सक्षम
पिढी तयार व्हायला मदतच होईल. बऱ्याच वर्षांपासून कुळधर्म आणि कुळाचार ह्या विषयाशी संबंधित एक
मोबाईल ऍप्लिकेशन बनवावे हा विचार चालू होता. आज अथक प्रयत्नानंतर हे खास मोबाईल अप्लिकेशन
मी डेव्हलप व लाँच करत आहे. ह्या अँप मागची प्रेरणा माझ्या आईची आहे. म्हणून मी हे मोबाईल
ऍप्लिकेशन मी माझ्या आईला अर्पण करत आहे.
[11/01, 18:55] नंदकिशोर अरविंद ढेकणे: माझ्याकडुन हा छोटासा प्रयत्न👆👆👆

1 

Share


N
Written by
Nandkishor Dhekane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad