श्री माधव दत्ता शिरवळकर आमचे शेजारी पाजारी. यांचं कुंटुंब म्हणजे आनंदाचा दुसरा खजीनाच.कितीही अडचणी आल्या तरी एकजुटीने त्याला सामोरे जावे आणि शेवटपर्यंत लढत राहणे.आमचे त्याचे संबंध म्हणजे एक चांगला शेजारी. तशे माधव आणि मी चांगले मित्रच. आमचं काम जरी वेगळ्या ठिकाणी असल तरी पण जाताना आणी येताना आम्ही सोबतच. गणेश चायवाला कडे एक चहा सकाळचा आमी एक चहा सायंकाळचा फिक्स. माधव हा माझा एक अविभाज्य घटक.कारण मला लिखाणाची खुप आवड.जेव्हा पण मी कविता लिहितो तेव्हा पहिली तोच ऐकतो. कधी कधी माझ्या कवितेला वेड म्हणतो.एखादी कविता प्रेम बिखरण्यावर आली की तो खुप हसतो.कधी कधी हे हसू मला कळतच नाही.मग त्याला विचारावं लागतं.खरंच एवढी बकवास लिहितो का. तो हसुन म्हणतो एवढी पण नको सुंदर लिहुस ,नाहितर उद्या तुझ्या अंगणात महिला काठी घेऊन येतील. असं का विचारलं तर म्हणतो,आले तुझ्या कवितेमुळे घटस्फोट घेणार नाही का ... ये ऐकुन मला माझ्यावर हसु ऐत.
कधीतरी माधव माझी कविता एवढी टक लावुन ऐकतो की मला वाटतं हा ती कविता जगतोय.या म्हणाल्या माणसाच्या घरात पहाटे जर गेलो तर या गोष्टी नक्कीच दिसतात. आजी शकुंतला बाई आपल्या खुर्चीवर बसून कोणतरी धार्मिक पुस्तक वाचत असताना.आजीला चश्मा लागला जरी असला तरी वाचण्याची आवड काय सोडवत नाही.आजीच वय हे आजच्या वेळेस सहासष्ट . तरी पण आजीला अजुनही कोणाच्या आधाराची गरज भासत नाही. आजी अनेकदा गावला जातात.मग तिकडुन आलेली गावठी फळ अनेकदा कधी आमच्या घरात येऊन बसतात यांचं भानही नसतं.
यानंतर आपल्याला दिसतात आजोबा. श्री दत्ता शिरवळकर.याना आपण पाटी घरात बघु शकत नाही.कारण यांचं ठरलंय काही का असेना एक चक्कर सकाळचा आणि सायंकाळ चार मारताच.आजोबा सत्तर पार पण अजुनही चांगली शरीरयष्टी, अत्यंत सुंदर राहणीमान.पण यांचं वेगळेपण म्हणजे सकाळची बातमीपत्र. जेव्हा वाचायला घेतात तेव्हा सर्वघराला कळत आजोबा बातमीपत्र वाचतात ये.कारण आजोबा सुरूच करतात राशीभविष्य.ते स्वरांचे शेवटी पण आजीच पहिल्यांदा वाचतात.कारण कोयना मारायला कुणी हवं ना. घरातली गडबड त्यावेळी शांत असते.
स्वयंपाक घरातुन येणारा उमंग पोह्यांचा वास आला की समजुन जावं राधा वहिनि. राधा वहिनीची ओळख म्हणजे भाजीला फोडणी देण्यासारखं.पहिल्यांदा जोराचा तडका होईल आणि मग त्यांनंतरचा स्वाद संपुर्ण घरभर पसरत राहिलं.....
राधा वहिनी आणि इतरांना भेटुयात पुढील भागात...