प्रेम म्हणजे असतं काय
तिच्या मागे फिरून फिरून
पातळ झालेली चप्पल
अन दमलेले पाय....
प्रेम म्हणजे असतं काय
तिने घरी सांगितलं की,
रागा रागात,लगबगीने,
तिची भांडत येणारी माय....
प्रेम म्हणजे असतं काय
आपला डाटा संपला की
शेजारच्या सोबत कनेक्शन
करून घेतलेलं वायफाय....
प्रेम म्हणजे असतं काय
तिचा होकार आला की,
हेवेदावे विसरून कॅफेत
घेतलेला प्रेमाचा चाय...
प्रेम म्हणजे असतं काय
दोघात तिसऱ्याच येणं
मग याला बाय त्याला हाय
शेवटी दारुसोबत चणा खाय...
कवी-बीबीशन कृपा नोळे
ता.किनवट जि. नांदेड