मी सौ माधवी माधवराव धर्माधिकारी , मला आज या नाटकातून आपल्या संस्कृतीचा मजबूत घटक म्हणजे आपले घर होय .ते कसे असावे आणि कसे असू नये यावर सादरीकरण करावयाचे आहे.
खेड्यातील घर असलेली सुशिक्षित ,अशिक्षित , शहरातील घर असलेली सुशिक्षित ,आणि त्याही पेक्षा परदेशातून जाऊन आलेली ही पण
अग सूनबाई , आमच्या काळात आम्हाला खूप काम होती ग , मुले पण जास्त होती, माहेरी पण जाता येत नव्हते. खूप त्रास काढला ग आम्ही.
सासूबाई तुमचे हे पुराण पहिले बंद करा, अगोदर आमचे असे, आमचे तसे.आम्ही फार सोसले, गरीबीच होती. पाणी नव्हते. लाईट नव्हती, मिक्सर नव्हता, फ्रीज नव्हते, नवीन काहीतरी सांगा.
अग मला केवळ तुला भूतकाळ सांगावा वाटतो ग . यात मला हे सांगायचे ग वर्तमान काळ किती छान . आता मी तरी काय करणार . दिवसभर प्रत्येकाच्या घरात हे वातावरण बघीतले की, मला तुला बोलावे वाटते ग . मन मोकळे होते माझे.
मन मोकळे होते का. ठीक मग तुम्ही लिहा ना. नाही तर थोडे मंदिरात भजन ,कीर्तन तेथे जा .म्हणजे तुम्हाला मजा येईल. वेळ ही भरपूर आणि काम मी करते सगळे घरी तुम्ही लवकर नका येऊ. म्हणजे मन खूप मोकळे होईल तुमचे. विषय पण तोच . आमच्या सुना . किती छान .बरे वाटेल तुम्हाला.
नाही तरी काय बोलणार तुम्ही. सारखी माहेरी जाते, उधळी आहे. घर सजावट तर नाद च नाही. संसार या शब्दाचा अर्थ पण कळत नाही. केस काय मोकळे सोडते. मुलांना वळण लावत नाही, नवऱ्याला अरे तुरे काय बोलते. साडी च घालता येत नाही, पाहुणे आले की ,कपाळावर आठ्या असतात. माहेरचे माणसे आले की काय प्रसन्न असते. मला हे काही ऐकायचं नाही. आमच्या ऑफिस मध्ये सगळ्यांच्या सासूबाई असेच बोलतात. म्हणून आम्ही ठरवले आहे आमचे आम्ही जगू. तुमचे तुम्ही जगा.
सासूबाई काय करावे बाई या पोरींना , कसे होईल या देशाचे, काळजी करायची .हातात तर काही नाही कसे समजवावे कसे संस्कार घडवावे . बघवत नाही. झोप येत नाही. काळ हातात नाही वेळ तर आहे ना हातात. प्रयत्न तर करू. काळजी वाटते ती नातवडांची.
कारण घर संसार आणि सजावट यातून आयुष्य सजत असते पिढ्यानपिढ्या चे. ,
सुन वैतागुन गेली आहे ।तिला मुले फार त्रास देत आहेत त्यातच दोघाचे भंडन