Bluepad | Bluepad
Bluepad
प्रयत्न , वेळ , आणि निर्णय . प्राथमिकता.
 Ghanshyam L Sangidwar
Ghanshyam L Sangidwar
23rd Jan, 2023

Share

माणसाच्या जिवन प्रवासात अनेकदा अनेक प्रसंगांत स्वःताला सावरत आयुष्याचा पुढील प्रवास करीत असतो . प्रवासात चालता चालता अनेकदा अनेक प्रसंगांत ठोकर बसतात . ज्या प्रसंगात आपणास ठोकर बसतात त्या प्रसंगानुसार आपण ती वेळ , ती घटीका , तो प्रसंग आपणा साठी अशुभ समजला जातो . परंतु अशेच प्रसंग आपणास जिवन जगण्याचा अंदाज शिकवित असतात . म्हणुनच अशा प्रसंगाचा आपण सन्मानच केला पाहिजे . आपण कितीही श्रीमंत असो तरीपण त्रास विकला जात नाही . आणि सुख विकत घेतला जाऊ शकत नाही. परंतु खरे प्रेम हे तर कुटुंबातच असते . कुटुंबात जर प्रेमानं जगल तर दररोज सुख मिळतो . अन्यथा दररोज महाभारत घडते . जिवन हे बर्फासारख आहे . त्याची चव घ्या किंवा नका घेऊ ते वितळणारच म्हणुनच जिवनात स्वःताला टेस्ट करणं गरजेचं आहे . नाहीतरी आज ना उद्या बर्फाप्रमाणे वेस्ट तर होणारच आहे . निसर्गाच्या या सृष्टीत प्रत्येक माणसाचा प्रवास भिन्न असतो . आणि प्रत्येकात काही ना काही कमी असतेच . प्रत्येकाच विचार , प्रत्येकाचं उद्दिष्टे , प्रत्येकाचं कार्य करण्याची पध्दती . सारं काही भिन्नच असते . नाहीतर सारी सृष्टीच समान असती . आणि पृथ्वीवर स्वर्गच दिसला असता . आणि महत्वाचं हे आहे की याचाच दुसरा रूप म्हणजे विविधताच सृष्टीला स्वर्गाहून सुंदर बनवत असते . तर माणसानं खोटं बोलायचं ठरवलं तर आपण कीतीही खोटं बोलले तरी दुसरा कोणी खोटं बोलत असेल तर ते सहन होत नाही . आपण इतरांवर कितीही रागावलो पण आपणावर जर कोणी रागावत असाल तर आपणास स्वतःलाच अत्यंत वाईट वाटते . करीता जिवनात स्वतः प्रती कठोर आणि दुसर्यांसाठी कोमल सरल असणं हेच जिवनाच प्रेम आहे . ज्ञान अशी गोष्ट आहे ते कोणावरही अधिकार दाखवु शकत नाही .ना कोणासोबत स्पर्धा . लोक जसे आहेत तसेच स्विकारणे . हेच ज्ञान आहे . प्रयत्न असा असला पाहिजे जे आपणास दुसर्यांकडून अपेक्षित असते तेच वर्तन आपले इतरांप्रती असले पाहिजे . आणि ते स्वताच्या आचरणात असलं पाहिजे . जिवनात यशस्वी सफल होण्यासाठी योग्य वेळ , योग्य निर्णय . योग्य विचार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे . उचित विचार हाच अनेक निर्णय ना जन्म देत असतो . हेच बिजारोपण होय . आणि योग्य बिजारोपण करण्यासाठी योग्य वेळेची गरज असते . अयोग्य वेळी केलेलं बीज अंकुरीत होत नसते . आणि या सर्वांसाठी गरज असते ते योग्य वेळी योग्य पध्दतीने प्रयत्न करण्यांची . आणि यासाठी आवश्यकता असते ते प्रसन्न मन . मनाची प्रसन्नता शांतता समाधान आनंद हेच जिवनात सौंदर्य आहे . महत्त्व पुर्ण हे नाही की आपण किती सुंदर आहोत . महत्त्व पुर्ण हे आहे की आपण किती प्रसन्न आहोत . आणि प्रसन्न मन हेच सकारात्मक विचारांना चालना देत असतो . आणि सकारात्मक विचार श्रेष्ठ संगतीनेच येतात . श्रेष्ठ संगतीनेच प्रेरणादायी विचार आणि बदल घडवून आणत असतात .
.
.

0 

Share


 Ghanshyam L Sangidwar
Written by
Ghanshyam L Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad