Bluepad | Bluepad
Bluepad
पंढरीच्या अंतरीचे भाव
सयाजी हाडवळे
सयाजी हाडवळे
23rd Jan, 2023

Share

🙏🌹🚩⚔️🚩🌹🙏
*पंढरीच्या अंतरीचे भाव*
*अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥*
*घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥*
*मज याचकाची पुरविली आशा । पंढरी निवासा मायबापा ॥२॥*
*नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥३॥*
*तुका म्हणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण माझ्या पांडुरंगा तुझे ॥४॥*
*संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील ७९७ क्रमांकाचा हा अभंग आपल्यातील असणारे अंतरीचे भाव पांडुरंगाशी कसे जोडले गेले आहेत याचे वर्णन करणारा आहे.*
*माझ्या मनात माझ्या अंतरंगात काय चाललय , किंवा तुझ्याविषयी काय भावना आहेत, हे गुजभाव पांडुरंगाने जाणून घेतले आणि तशी कृती माझ्याकडुन करून घेतली..*
_पाडुरंगा तुझी स्तुती करण्यासाठी वापलेले गेलेले माझे सारे शब्द तू झेलले आहे परंतु खाली पडून दिले नाहीस..._
_पाडुरंगा, मायबापा तू अनाथांची माऊली आहेस. तू गरीबांचा कैवारी आहेस. हे पांडुरंगा, पंढरीनाथा, मायबापा माझ्या सारख्या याचकाची तू आशा, अपेक्षा, इच्छा पूर्ण केलीस. व माझ्या मनात.. अंतरंगात जी भेदाची व भेदभावाची आशंका होती तू तिचा निवाडा केला, नाश केला आहेस._
*म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या कृपेने तू मला निर्भय केले आहेस, माझ्या मनातल्या भावाचे व शंकेचे निरसन केले आहेस. मला तुम्ही आश्वस्त केले आहे. आता मी माझ्या विठ्ठलाच्या, पांडुरंगाच्या आवडीने अपार गुणगान गात राहील.*
_हे विठ्ठला पांडुरंगा तुझ्या नामात तल्लीन होऊन जाईन आणि तुझ्या नामाचा गजर आयुष्याभर मनोभावे करीन._
_*बंधू भगिनींनो जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पुर्ण होत नाहीत. तेव्हा आपल्या आयुष्यातील मार्ग बदला, परंतु सिद्धांत नाही...*_
_*कारण झाडं नेहमी पाने बदलतात मुळया नाही...*_
_*महणूनच भगवत गीतेमध्ये स्पष्ट लिहीलय "निराश होऊ नको, कमजोर तुझी फक्त आणि फक्त वेळ आहे तू नाहीस..."*_
*तात्पर्य* -
*नाम तुझे देवा l केशवा माधवा l*
*मुखी हा गोडवा l पांडुरंगा पांडुरंगा ||*
🌹 _*शिवप्रभात*_ 🌹

0 

Share


सयाजी हाडवळे
Written by
सयाजी हाडवळे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad