शेतातून शेती विकत घेणारा अवलिया......
.. आई नी तुम्ही माझ्या वर विश्वास केला होता. पण आता.... ( बाबाराव पुढे बोलणार एवढ्यात) दादा म्हणाले अरे बाबाराव अस नसत बाळा ती काळी आई आहे . पोट भरते तीच कधी कधी समाधान झालं नाही तर ती आपल समाधान कसं करेल. इतक्या लवकर तू हरलास सुद्धा......
अरे माझ्या पठ्या उठ..... उभा हो..!! डोळे पुस.. कामाला लाग.... त्या काळ्या आईची लहान भूक भागव तिला हवं ते तू दे .... मग बघ ती तुला नाराज करते का.... नको असा थांबू पुढे चाल.....
तू थांबलास तर पुढे कधीच जाऊ शकणार नाहीस तुला कोणत्या ही क्षेत्रात अपयश हे येणारच आहे. हे लक्षात ठेव. ह्या गोष्टी बाबाराव यांच्या साठी बाळकडू आणि खूप मोठी शिकवण होती. त्या होती मनावर तर घेतल्याचं पण एक शिकवण म्हणून ह्या गोष्टीची गाठ त्यांनी बांधली..... आणि वडील दाखवतील त्या रस्त्यावर पुढे जात राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने वागले सुद्धा....
शेती करत करत त्यांच्या अस लक्षात आले की आपण भाजीपल्याची शेती सुद्धा करू शकतो. म्हणून मग वडिलांच्या आणि भावंडांच्या मदतीने त्याने भाजीपाल्याची शेती केली . लागवड एकदम बारीक निरीक्षणाखाली झाली होती. त्यात कुठे च कमी पडू नये ह्याची काळजी बाबाराव ने घेतली होती. मग काय प्रचंड प्रमाणात भाजी पाला निघाला आणि मग आता ह्याची मार्केटिंग कशी करावी नुसतच गावात विकून जमणार नाही च कारण खूप प्रमाणात भाजी असल्याने त्यांनी कुठे तरी दुसरीकडे विकायला जाणे गरजेचे होते.
मग भाऊ आणि वडील ह्यांच्या सहमतीने त्यांनी भाजीपाला तहसील असलेल्या ठिकाणी म्हणजेच तालुका ठिकाणी नेण्याचे ठरवले. आणि तसे केले सुद्धा.... मग आता त्या काळात 50 पैसे ह्या भागात भाजीपाला विकून सुद्धा बाबाराव खुश होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले होते.
त्यांना त्या गोष्टीचा आनंद तर झालाच पण एक गोष्टी शिकायला मिळाली आणि ती म्हणजे आपण शेतीची इच्छा पूर्ण केली की ती आपल्या इच्छा पूर्ण करते. ह्या सोबत सुरू झाला बाबाराव चा शेती प्रेम. .....