Bluepad | Bluepad
Bluepad
आत्मविश्वास निर्माण करेल असं शिक्षण मिळण गरजेचं
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
23rd Jan, 2023

Share

*आत्मविश्वास निर्माण करेल असं शिक्षण मिळण गरजेचं*
लाथ मारेन तिथे पाणी काढीन एवढा विश्वास बळ आणि आत्मविश्वास स्वतःच्या प्रयत्ना मध्ये असला पाहिजे . शेवटी विश्वास आत्मविश्वास हेच आत्मबल आत्म शक्ति आहे .हे बळ मजबूत असेल तर अशक्य वाटणारी बाब सुद्धा सहजगत्या शक्य होते . आत्मबल दुबळ असलं तर आपण कितीही शक्तिशाली असलो तरीही आपण दुबळेच . दुबळेपणा हा काही शाप नाही .ते आपल्या आत्म शक्तिच प्रतिक आहे .आपलं एकंदरीत मुल्यमापन जगात किंवा सार्वजनिक पातळीवर ठरताना आपला आत्मविश्वासच आपलं मुल्य निश्चित करत असतो .मग जीवनातील कोणतीही बाब असेल अथवा आपलं आयुष्य घडवणार शिक्षण हे आत्मविश्वासाला बळकटी देणार असलच पाहिजे. पण विद्यमान शिक्षणात हि कमी जाणवतं आहे .हि नक्कीच खंत आहे .पण कुठेतरी बदल झाला पाहिजे परस्थिती बदलली पाहिजे आणि परस्थिती बदलणं हि वेळेसोबत काळाची गरज आहे.शिक्षण देत असताना शिक्षण हे फक्त पुस्तकां भोवती फिरण्या ऐवजी आत्मविश्वास जागृत होईल आत्मविश्वासा निर्माण होईल असं शिक्षण देणं गरजेचं आहे. शिक्षणामुळे दुबळेपणा नष्ट झालाच पाहिजे. आत्मविश्वासा पेक्षा मोठ‌ दुसरं बळ या सृष्टी वर नाही. शक्ति किती आहे यांपेक्षा आत्मविश्वास किती हे महत्त्वाच ठरत .आत्मविश्वास असेल हरलेली लढाई जिंकता येते .आणि आत्मविश्वास नसेल तर जिंकलेले सुद्धा हातुन निसटत . आत्मविश्वासाने एखाद्या गोष्टीला सामोरे गेलो तर अशक्य प्राय असं काहीच नाही.व्यक्तिगत पातळीवरील असे कि सामाजिक पातळीवरील उत्थान हे शिक्षणाशिवाय होत नाही.एंकदरीत शिक्षणाचं महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे.आणि याच शिक्षणातुन निरुपयोगी सुशिक्षित बेरोजागर नाही तर स्वतःसह इतरांच भविष्य घडवणारे व्यक्तिमत्व घडले पाहिजे हिच शिक्षणाची मोठी किमया आहे.पण हल्ली शिक्षण आणि शिक्षणाचं होतं असलेलं व्यापारीकरण यामध्ये मग सर्वसामान्य माणसाला शिक्षण परवडेल का पण फार मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. खुप मोठ्या प्रमाणात आर्थिक भार उचलुन सुद्धा हाती काहीच लागत नाही. त्यामुळे अनेक तरूणांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे.अनेकांना तर आपण कशासाठी शिकतोय हेच माहित नाही हे ऐकल्यावर हासायला येईल पण हा विनोद नाही तर सत्य परिस्थिती आहे. मग नेमकी गडबड कुठे व कशी होतं आहे. आणि जर हिच गडबड शोधली नाही उमजली नाही तर भविष्यात याचे खूप मोठे दुरगामी परिणाम होतील .आणि हे परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागतील.त्यासाठी काय तो सोक्षमोक्ष एकदाचं लागला पाहिजे त्या दिशेने पाऊल टाकणं गरजेचं आहे. मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करेल आशा शिक्षणाची खरी गरज आहे . पण हिच उणीव आहे आणि या उणीवेची अजुनही कोणालाही जाणिव होताना दिसत नाही.शिक्षण हेच जीवनातील परिवर्तनाचे सर्व श्रेष्ठ माध्यम असल तरी सध्या ज्या पद्धतीने शिक्षणाचं व्यापारीकरण चालू आहे हे पाहिल्यावर त्या वंचित पिडीतांचे आणि गरिबांच्या शिक्षणाचे काय हा प्रश्न आपसूकच निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.शिक्षणाच्या मंदिरात व्यापारीकरणाचा शिरकाव एवढा प्रचंड असं कधी कुणाला आपल्या पुर्वजांना कधी वाटलं नसेल पण आपण हा अनुभव प्रत्याक्षात घेतोय . आणि आपल्या पुढील काळात हे किती प्रमाणात वाढेल याची विचारता सोय नाही . शिक्षणाच्या क्षेत्रातील हि सगळी परस्थिती पाहुण निम्या पेक्षा जास्त विद्यार्थी तर गांगरून गेले आहेत.काय वाचावं कोणता क्लास करावा अमुकचा यशाचा गुरुमंत्र तमुकचा यशाचा गुरूमंत्र सगळीकडे फक्त यशाचे गुरूमंत्राचे जोरदार वारे वाहत आहेत.पण अंतर्गतप्रेरणा निर्माण झाल्याशिवाय सगळे मंत्र निरुपयोगी आहेत . मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणार शिक्षणाचं गायब आहे.आणि खरी गरज हिच आहे कि मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करेल अशा शिक्षणाची मुलांना गरज आहे.पण त्या पद्धतीने शिक्षण उपलब्ध करण्यासाठी कोणीही प्रयत्नशील नाही हेच खेदजनक आहे. भविष्यातील पिढी सक्षम करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणार शिक्षण उपलब्ध असणं आणि सगळ्यांना मिळणं अंत्यंत गरजेचे आहे.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad