Bluepad | Bluepad
Bluepad
!! पाऊलवाटा !!
धर्मराज रत्तू पवार
23rd Jan, 2023

Share

अशा होत्या बालपणीच्या त्या पाऊलवाटा
पाऊसपाणी अन् चिखल असे बटबटा
तर कुठे उन्हाळ्यात त्यावर भरलेला फुफाटा
पडलेले बहु चिपकाटे , अथवा पसरलेला सराटा
पाऊसपाण्याने वाहून गेलेली वरची माती
मातीखालचे उघडे पडलेले दगड अन् साठलेली रेती
चालता अनवानी लागून ठेचा फुटावी पायबोटे
फुटल्या रक्ताळल्या बोटा बांधून चालावे चिरगुटे
कुठे सपाटरानी सरळ गेलेल्या रेषेवानी
गवतावरून मवूमवू कुठे अंथरला गालीच्छावानी
कुठे लवत लवनातून उतरलेल्या ओढ्यात
छाती काढून कुठे चढत चढणीवरती जात
दुतर्फा झाडे झुडपे घेऊन विविधरंगी फुले शिरी
रंगीबेरंगी फुलपाखरे भिरभिरती सदा त्यावरी
वळत वळत वळणे घेत गेलेल्या नदीकिनारी
चढत चढत गेलेल्या चढल्या ऊंच गिरीशिखरी
कुठे दबकत थबकत लपत छपत गेलेल्या डोंगरटेकड्याआड
आपल्याच अंगावरती कुठे कुठे घेतले बोरीबाभळीचे झाड
चालत जाता वाटेवरूनी कुणी त्या ताड ताड
अवचित धरूनी त्यास थांबविती ना तर फाडती कापड
गावातून गेलेल्या शेतशिवारात कुठे तळ्याकाठी
जांब बोरी पाहून कारी त्यातून झाल्या फाटाफुटी
चिंच , आवळा , कच्च्या कै-या झाड गाठले चिकट शेलवटी
पिकले जांभूळ , चाफा , झेंडू , फुले गुलबसी फळाफुलांनी भरली ओटी
------------ धर्मराज रत्तू पवार

0 

Share


Written by
धर्मराज रत्तू पवार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad