Bluepad | Bluepad
Bluepad
.मनात आले सांगून टाकले
Shashikant Harisagam
Shashikant Harisagam
23rd Jan, 2023

Share

मनात आले सांगून टाकले........
............................................
घेतला वसा टाकणार नाही......
......................................................
पन्नाशीत आलाय तो आज.विशीतला खोडकरपणा.
तसाच खोडसाळपणा.गेलाय कुठे ? आहे तसाच अंगाअंगात.
त्याचे असते बोलणे म्हणे सहजप असते. टोचून बोलावे समोरच्याला, त्याच्या मनात कुठे असते. जखम व्हावी मनास कुणाच्या असे काही नसते.
अरेरे! लक्षात कुठे ऐकणाऱ्याच्या. ऐकणारा सरळ मनांचा. बोलावे मोकळे. खेळावे समाधानाचे. बोलावे असे कुणी आपल्याशी त्याने व्हावे नाते अधिक मोकळे. नसावी गुंतागुंत जास्त त्यात. करावे मन मोकळे. बागडावे मस्त अंग हलवून हलवून.
तो आहे अवखळ, थोडासा खोडकर. ऐकले होते त्याच्याच मित्राकडून. अगदी मित्राच्या मित्राकडून.
नसते मनात त्यांच्या आपले शब्द कुणाला टोचवेत. अंगावर धावून शब्दांनी समोरच्याला बोचकरावे. असेही होतो ऐकून ? खरे काय ?
विचारले मी त्याला. ज्याने ही अनाहुत माहिती दिली. ' ' तुझ्या खूप परिचयाचा आहे का तो ? तुझी त्याची घसट किती?किती खोलाचा परिचय तुझा ? तुझी त्याची जवळीक किती? '
तो अनामिक अगदी त्या अनामिकाच्या मित्राला पण विचारले. ' छे रे! कोणाचा परिचय ? त्याचा आणि माझा ? आत्ताच तर झालाय परिचय. मित्र झालाय माझा ! ' उत्तर दोघांचे आले.
' नीट ओळखत नाहीस तर मग तू सांगतोस त्याच्याविषयी सर्व काल्पनिक का ? का असे त्यांच्याविषयी अनुमान काढतोस ? '
तो खोडकर आहे. नेहमी खोड्या करतो. दुसऱ्याविषयीं तो नेहमी घालून पाडून बोलतो.त्याचे कौतुक कुणी करत नाही. सारेजण त्याला दुषणे देतात.
दोघांनाही स्वतंत्र गाठून विचारले.
तो जरा जास्तच झकपक राहतो. थोडासा पोरकटपण आहे. तो वाचालवीर बडबड्या आहे. बायकात बहू बडबडणारे असतात ना अगद्दी तशी ठेवण वाटते त्याची. म्हणून आम्ही आनंदाने बोललो त्याच्याविषयीं.
मी थोडासा दुःखी झालो.बोलून बसतो आपण. पण या मुखातून त्या मुखात. कानोकानी होऊन जाते. नसलेले गुण चिकटले जातात. हे डिंकापेक्षा चिकट. चिकटले कीं अंगाची सालपटे निघतात. फेविकॉल का जोड है भाई, निकलेगा नही. जाहिराती सारखे.
कुठलीही खात्री न करता, कसलाही अनुभव न घेता आपण बोलतो. पराचा कावळा तर करीत नाही. मुळात मोर असलेल्याची अशी पीसे काढून त्याचा लांडोर बनवण्याचा हा प्रयत्न एखाद्याची प्रतिमा खराब करण्याचा खेळ सावल्याचा म्हणता येईल.
शब्द माणसाला मोठे करतात. तसेच ते माणसाला माणसातून उठवतात. यात जो बळीचा बकरा होतो त्याला जीवनातून उठण्याची वेळ आणतो आपण अप्रत्यक्षपणे हे लक्षात कसे घेतं नाही आपण.
त्या दोघा अनामिकांना केलेल्या प्रश्नाला अपराधी मनाने उत्तर शोधायला लागले ते. अपराधी मन त्यांचे त्यांनाच खावू लागले.
' आज डोळे उघडलेत तुम्ही माझे '
त्यांच्या आवाजात अपराधी भावना होती.
' काहीही विश्वासार्ह माहिती हाती नसताना, कुठलाच प्रत्यक्ष अनुभव घेतला नसताना एखाद्याच्या माघारी चावण्याची खोडी,एखाद्याची बरी वाईट प्रतिमा करण्याची सवय मी नक्की सोडेन. '
जाताजाता त्याने दिलेले वचन अश्या विश्वासपूर्ण शब्दात दिले कीं तो उतनार नाही,मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही हे त्याने न सांगताही समजले
.... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर.

0 

Share


Shashikant Harisagam
Written by
Shashikant Harisagam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad