सडेतोड उत्तर... ....
......................................................................
नाटकर शेक्सपियर तुम्हा आम्हाला तसा परिचयाचा. त्यानंतरचा तितकाच समर्थ हजरजबाबी नाटककार म्हणजे जॉर्ज बर्नाड शॉ असे आवर्जून सांगितले जाते. शॉ त्यांच्या अवखळ विनोदी स्वभावाबद्दल प्रसिद्ध होते.शॉ यांचे बद्दल एक गोष्ट सांगतात.
बर्नाड शॉ यांना एके दिवशी पत्र आले. पत्रात मुद्दामच खावंचटपणे लिहिले होते.
प्रिय श्री शॉ साहेब,
मी तुमचे अमुक अमुक पुस्तक वाचले. फार फार आवडले. *आपण ते पुस्तक कोणाकडून लिहून घेतले हे मात्र त्या पुस्तकात कुठे नमूद केलेले नाही* तरी त्या लेखकांचे नाव तेवढे कळवावे.
आपला,
X Y Z
शॉ साहेबांनी ते पत्र काळजीपूर्वक वाचले. पत्रलेखकाचा खवचटपणा शॉच्या नजरेतून अजिबात सुटला नाही.त्यांनी त्या पत्र लेखकास तात्काळ उत्तर पाठवले ते असे...
प्रिय अमुक अमुक,
सादर नमस्कार.
तुमचे पत्र मिळाले. पत्राबद्दल आभार. माझे अमुक अमुक पुस्तक आपण वाचले आणि ते आपणास आवडल्याचे कळवीले त्याबद्दल आभार.
आपण आपल्या पत्रात पुढे अशी चोकशी केली आहे कीं हे पुस्तक मी कुणाकडून लिहून घेतले.? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे एक क्षणात मी त्या लेखकाचे नाव कळवू शकतो. तथापि त्यापूर्वी माझे ते पुस्तक आपण कुणाकडून वाचून घेतले हे कृपया त्वरित कळवावे.
आपला,
जॉर्ज बर्नाड शॉ.
शॉ चे हे उत्तर वाचून त्या पत्रलेखकाची काय स्थिती झाली असेल ते देवच जाणे.
सुप्रभात मित्रो.....!
सुंदर सकाळच्या अतिसुंदर शुभेच्छा.
संकलक : शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर.