याआधी माझं आयुष्य एका चौकटीप्रमाणे होतं.....ठराविक लोकं,ठराविक कार्यपद्धती,ठराविकच आणि मोजकाच संवाद...!
नंतर ती चौकट तुटली ...जणू त्या चौकटीने मला मुक्त केलं!
पण मला त्या चौकटीच्या बाहेरचे जग आणि त्यातले विविध आकार कधी माहितच नव्हते...ठराविक आणि मोजक्या भावना जपणारी मी या गर्दीत गोंधळून गेले... हरवुन गेले!
घाबरुन ,सावरून कसबस या पासुन पळ काढत मी स्वतः भोवती एक वर्तुळ तयार केले...
एकांत...........................मी आणि फक्त मी!
सगळी भीती नाहीशी झाली जणू.....!
पण नंतर जाणवलं की चौकटी बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून मी जे स्व केंद्रित वर्तुळ निवडलं होतं, त्यातला एकटेपणा बाहेरच्या गर्दीपेक्षा जास्त जीवघेणा होता.....!!!
आता मी या वर्तुळातून बाहेर पडण्याचा अस्फुटसा प्रयत्न करतेय....केला....
पण तोही अगदी सहज सोपा नक्कीच नाहिये आणि नव्हताही!
इथेही खुप सोसलं.......सहनशक्तीची मर्यादा ओलांडून अस्तित्वाचा छोटासा बिंदू जपण्याच्या नादात आयुष्य अर्थहीन होऊन बसलं!!!!
आता ना वर्तुळ आहे ना चौकट...उरलय केवळ आकारहीन आयुष्य!