मागणं
आता कसं घालू मी मागणं
पोरी करेनात आता लग्नं ...धृ
आईबापाची लाडकी पोरं
करीयरच तिला भारी वेडं ...१
खूप सुधारल्या आता पोरी
झाल्या पैसा मिळवणारी खाणं...२
पोरं राहिली अडाणी मागं
काय केल्या होईना पोरांची लग्नं ....३
जाईलं पोरींचं वय निघून
कोण कशाला घालीलं मागणं...४
ज्या त्या वयात जे ते व्हावं
ऐका जुन्या लोकांच म्हणणं....५
कवि अटलविलास