आज बऱ्याच महिन्यांनंतर लिहायची संधी मिळाली. रात्र दिवस एकच विचार .हल्ली का सुचत नाही.आपण का लिहीत नाही.मनात सर्व साठून ठेवलं ..कागदावर का उमटत नाही..दिवस रात्र आपण कामात व्यस्त.आई वडिलांची सेवा हीच आपली ईश्वर सेवा ती तर मी मनापासून करत आहे...त्यांतून वेळात वेळ काढून कुठे तरी मी लेखणीचा आनंद लुटत आहे.आज लेखणी सरसावली.आत्ता वळून नाही पहायचं.पुढे पुढे जायचं .व्यक्त व्हायचं..कळू दे आपुल्या मनातल्या भावना...आज मला शोधायचं आहॆ..माझेच मला...गवसणी घालायची आहे नभाला..तुझ्या सारखं मला स्वच्छंदी कर..मला भरारी घ्यायची संधी दे..एक उंच झेप ....जणू गरुड झेप.पक्षी नभात भरारी घेतात व त्यांच्या पंखात इतकी ताकद असते ते मनमोकळेपणाने विहार करतात..आज अगदी तसं झालं आहे...लेखन ही आवड ह्यांने स्पुर्ति मिळते मनाला..आनंद मिळतो तो आल्हाददायक..ही सतत लेखणी धारधार राहू दे हीच ईच्छा...नवीन विचार नवीन कल्पना..नवीन काव्य सुचू दे...हे सारं लेखणीतून कागदावर उमटू दे..हीच एक हीच ईच्छा.....मीना हडकर