रागावलीस का सखे कविता माझी वाचून
मला तरी कोणंय सांग सखे तुझ्या वाचून
निळं निळं आकाश जेव्हा जेव्हा येते भरुन
तुझ्यासाठी चार थेंब ठेवतो तेव्हा जपुन
कसे सांगू तुला मन तुझ्यातच गुंतले हे
कधी भेटशील सांग रात्र गेली उलटुन
किती रंग, किती गंध हासणा-या त्या फुलांना
तुझा स्पर्श, तुझा श्वास त्यांनी घेतला पिऊन
सांग सखे सांग मला सर्व काही मनातले
फेकल्या मी चांदण्या घे एकटीच तु भिजून
एकटाच मी जेव्हा एकटीच भेटलीस तु
उष्ण वारा सोबतीला चंद्र गेला गारठुन
तुच शब्द, तुच अक्षर, तुच माझी कविता
मी तुझा,तु माझी बघ मला मिठीत घेऊन
@श्रीधर कुलकर्णी कळंब