Bluepad | Bluepad
Bluepad
Title

7
7878
22nd Jan, 2023

Share

माझा मर्‍हाटीछे बोल कोतुके
मकरसंक्रमणाच्या दिवसापासुन १४जानेवारीला मराठी भाषा संवर्धन दिनाला सुरुवात झाली.दि.२८जानेवारीपर्यंत हा पंधरवाडा साजरा शासनस्तरावरुन साजरा होत आहे.अनेकांना तर ठाउक असेल असही वाटत नाही.'नेमेची येतो पावसाळा'यासम शासनस्तरावरुन हा साजरा जरुर होतो आहे.
या निमित्याने विविध कार्यक्रमांची रेलचेल दिसते.चर्चा,परीसंवाद व्याख्याने यातुन मराठी भाषा संवर्धन करण गरजेच असल्याच प्रतिपादन करण्यात येत आहे.राज्यातील सर्व स्तरांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करत उत्साहात साजरा करण्याबाबत मराठी भाषा विभागाने एका शासन परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.राज्यात मराठी भाषेचे संवर्धन, विकास व्हावा, यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत आहे. मराठी भाषा विभाग मराठी भाषेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्ती यांना बळ देण्यासाठी कायमच तत्पर असतो. विशेषता: मराठी भाषेचा वापर सर्वच क्षेत्रात व्हावा यासाठी मराठी भाषा विभाग सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत आहे. सन २०१३ पासून दरवर्षी दि.१४जानेवारी ते२८ जानेवारी या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा केला जातो.
मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या मुख्य हेतूने दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हा पंधरवडा साजरा करण्यात येतो. सद्याच्या कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादूर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वत्र घालण्यात आलेले निर्बंध लक्षात ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त कार्यक्रम ऑनलाईन साजरे करण्याबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत. हे कार्यक्रम साजरे करतांना सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाणी यांचा व्यापक स्वरुपात वापर करून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यात यावा.सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांना सुयोग्य असलेले कार्यक्रम आयोजित करून हा “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” समारंभपूर्वक साजरा करण्याबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या कार्यक्रम करणे शक्य आहे, त्या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाने आखून दिलेल्या कोविड प्रतिबंधक सूचनांचे तसेच मार्गदर्शनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या पंधरवडयादरम्यान विविध मराठी भाषेतील तज्ञ, नामवंत व्यक्ती, लेखक यांचे परिसंवाद,व्याख्याने,कार्यशाळा, शिबीरांचे आयोजन,मराठी भाषेसंबंधीत प्रश्नमंजुषा,निबंध, कविता लेखन,वक्तृव स्पर्धाचे आयोजन, ग्रंथ प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच आधुनिक प्रसार माध्यमांमधून मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करावी.
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार वर्जित प्रयोजने वगळता १०० टक्के शासकीय कामकाज मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. तर त्रिभाषा सुत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालय आणि सार्वजनिक उपक्रमांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. राज्यात तसेच जिल्हास्तरावर त्यांच्या अखत्यारीतील कार्यक्षेत्रात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न करावेत व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून उत्साहात साजरा करावा.असे आदेश मराठी भाषा विभागामार्फत देण्यात आले आहेत.
मराठीभाषा ही इंडो-युरोपीय
 भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.
मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.२०११ च्या जनगणनेनुसार,
 भारतात सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे. ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.ही भारताच्या प्राचीन भाषांपैकीग एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे.
मराठीचे वय सुमारे २२०० वर्ष आहे.हजारो वर्षापूर्वी लिहिला गेलेला 
श्रवणबेळ्गोळ येथे गोमटेश्वराच्या
 पुतळ्याखाली मराठी भाषेतील 
पहिला शिलालेख आढळतो.
महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे.आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.मराठी भाषा मुख्यत्वे भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा,उत्तर 
कर्नाटक(बेळगांव, हुबळी-धारवाड
, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण, सुरत,बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद) मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील ९राज्ये,४केंदेशशित प्रदेश आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.भारतासह,फिजी,मॉरिशस व 
इस्रायल या देशांतही बोलली जाते.[त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने,संयुक्त अरब अमिरात,दक्षिण आफ्रिका,
 पाकिस्तान,सिंगापूर,जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व 
न्यूझीलंड येथेही बोलली जाते.
मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता कार्यरत संस्था आणि त्यांचे योगदानसंपादन करा
भाषा सल्लागार मंडळ : हे बंद पडले आहे[ संदर्भ हवा ].
भाषा संचालनालय
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ : हे बंद पडले आहे[ संदर्भ हवा ].
भाषा सल्लागार समिती
विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती (केवळ अस्तित्वमात्र शिल्लक आहे)[ संदर्भ हवा ].
राज्य विकास मराठी संस्था (१९९२) : (केवळ पुस्तक प्रकाशने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित करण्याचे काम करीत राहिल्याने या संस्था-स्थापनेचा मूळ हेतू बारगळला आहे)[ संदर्भ हवा ].
मराठी भाषा अभ्यास परिषद
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
विदर्भ साहित्य संघ : ही बिनसरकारी संस्था आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था .
मराठवाडा साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
बालकुमार साहित्य्य मंच, सोलापूर ही बिनसरकारी
संस्था आहे.
अभिजात मराठी भाषा परिषद : ही बिनसकारी संस्थ आहे. [

0 

Share


7
Written by
7878

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad