Bluepad | Bluepad
Bluepad
काकाजी (मान कि अपमान )
गजेंद्र गोवींदराव कुडमाते
गजेंद्र गोवींदराव कुडमाते
22nd Jan, 2023

Share

नमस्कार मित्रांनो, कसे आहात, आनंदी आहात ना. आज पुन्हा तुमच्या पुढे उपस्थित झालोय तुमच्या आनंदात भर घालायला. अहो मी खरं बोलतोय, आजचा विषय हा तुम्हांला गुदगुदवायचा आहे, काहीसा त्रास देण्याचा सुद्धा आहे. परंतु शेवटी मजा येणार आहे. तर मित्रांनो, आजचा विषय आहे " "काकाजी". तुम्ही म्हणाल हा वेडा कसले कसले अतरंगी विषय घेऊन येतो. हे सगळं बोलताना तुमच्या चेहर्‍यावर एक स्मित हास्य जरूर येणारं हे नक्कीच आहे, तर करूया सुरुवात.
तर मित्रांनो, आजचा विषय "काकाजी" हा आपल्या सगळ्यांच्याच ऐकलेला आणि अनुभवलेला विषय आहे. आपला भारत देश विविध रीती परंपरा आणि नाते गोते यांनी भरलेला आहे. आपल्या देशात विभिन्न जाती, भाषा, बोली आहे. वेगवेगळया प्रांतांत वेगवेगळी भाषा आहे. तसेच आपल्या देशात हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून आहे आणि बाकी सर्वच मातृभाषा आहेत. तर बाकी भाषेचं मला माहीत नाही परंतु हिंदी आणि मराठी भाषेतील कटू आणि गमतीदार अनुभव जो माझ्याबरोबर आणि माझ्यासारख्या तुम्ही मित्रांबरोबर दैनंदिन जीवनात रोजच घडतो. त्याचं अनुभवाला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी हा विषय घेतला आहे.
वर म्हटल्याप्रमाणे हिंदी आणि मराठी भाषेत आपण म्हणजे महाराष्ट्रातील लोकं वावरतो. तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांत वेगवेगळी नाती गोती वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात. त्यात आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा हे तर मुख्य आहेतच. परंतु आईच्या भावाला मामा, वडिलांचा भावाला काका, आईच्या बहिणीला मावशी, वडिलांचा बहिणीला आत्त्या म्हणतात. लिहायला गेलो तर पान भरून जाईल इतके नातेबंध आहेत बाकी सगळ्यांचा विचार बाजूला सारून मी फक्त मुद्द्याचं बोलतो, म्हणजे "काका" याबद्दल बोलतोय. जसे मी आधी बोललो आपला भारत देश हा रिती रिवाज, नातीगोती, परंपरा यांनी परिपूर्ण आहे. यात मोठ्यांना आदर सन्मान आणि लहानांना प्रेम देण्याची संस्कृती आहे. त्यानुसार कुठल्याही मोठ्या व्यक्तींना मानाने हाक मारतांना काका मामा असे बोलतात. वर म्हटल्याप्रमाणे काका कुणाला बोलतात आणि मामा कुणाला बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे.
आपण ज्यांना ओळखतो किंवा नातलग असतील तर हक्काने त्याला आपण मामा किंवा काका बोलतो. परंतु समोरील व्यक्ती हा अनोळखी असेल आणि तो वयाने आपल्याशी मोठा असेल तर पहिला शब्द निघतो तो "काका" काका हा शब्द ओळखी आणि अनोळखी दोघांसाठी हि मनमोकळेपणाने वापरता येतो. मामा या शब्दाला मात्र काही अडचण असते. ती म्हणजे कोणतीही स्त्री अनोळखी पुरुषाला सहसा भाऊ काय काहीही बनवत नाही. दुसरा म्हणजे कुठलाही पती त्याचा पत्नीचे संबंध अनोळखी व्यक्तींशी जोडणार नाही किंवा जुडू देणार नाही.तिसरा म्हणजे कुठलाही अनोळखी पर पुरुष कुठल्याही पर स्त्रिचा बाकी सर्व होईल परंतु भाऊ बनण्यास तयार होत नाही. हि तर झाली सर्वसामान्य जीवनातील सत्य, आता मुख्य मुद्दयाचं म्हणजे माझा तुमचा कटू अनुभवाबद्दल बोलू.
तर मित्रांनो माझाबरोबर तुमच्या सोबतही असे घडले असेल. तर मी एकदा बसने प्रवास करत होतो. बस तशी रिकामीच होती, परंतु सगळ्याच सीटवर लोकं बसले होते. आम्ही दोघं नवराबायको बसलो होतो. एका स्टॉपवर बस थांबली, बसमध्ये एक परिवार चढला. त्या परिवारात पती पत्नी आणि दोन १९ ते २५ वर्षांची मुलं मुली होते. बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी नजर बसमध्ये टाकली तर एकही सीट रिकामी नव्हती. तिच्या पती आणि दोन मुलांनी रिक्वेस्ट करून जागा मीळवली होती. आता त्या स्त्रीची पाळी होती. तिने आमच्याकडे बघितले तर आता आम्हाला वाटलं की ताई, दादा थोडंसं सरकता काय? असं काही कानावर पडेल. तोच तिने तोंड उघडले " काकाजी थोडं सरकता काय?" तिच्या तोंडून काकाजी हा शब्द ऐकताच मी माझ्या पत्नी समोर कुठल्याही स्त्रीला इतका पारखून न बघणारा तिच्याकडे संपूर्ण निरखून बघितलं. तशी माझी हिंमत होत नव्हती परंतु माझी पत्नीही तिच्याकडे तशीच निरखून बघत होती. तिचा चेहर्‍यापासून तर पायाच्या बोटांपर्यंत मी तिचे कपडे काय तिचे शरीर काय सगळंच निरखून बघितले. आता मी स्वत:बद्दल सांगतो माझा जन्म १९७८ म्हणजेच मी वयाने ४४ वयाचा आहे. ती स्त्रि १९ ते २५ वर्षांच्या मुला आणि मुलीची आई होती. तिचे वय साधारणतः ३८ ते ४० वर्ष असेल. चेहर्‍याने सुंदर आणि सुसिक्षित होती. शरीरांने मेन्टेन आणि चांगल्या घरची होती. परंतु तिच्या तोंडून "काकाची" हा शब्द ऐकून मी आणि माझी पत्नी दोघेही सुन्न झालो. आमची काय गोष्ट म्हणता तिच्या पती जो माझ्याच वयाचा होता तो सुद्धा आता हतप्रभ राहिला होता. माझ्या पत्नीला राग आला होता परंतु मी तिला इशारा केला. तर माझ्या पत्नीने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तसेच बसून राहिल. ती पुन्हा म्हणाली, " काकाजी काकूंना सरकायला सांगा ना" तेव्हा तर क्रोधाग्नी आणखीच भडकली होती. माझी पत्नी जागेवरून थेट उठली आणि तिला बोलली, " काय गं बाई! मम्मीचं दुदू पीऊन आली की नाही? तू तर लहान बाळ आहेस घरातून मम्मीशिवाय बाहेर का बरं आलीस". हे ऐकतांच ती थोडी सन्न झाली आणि बोलली. तुम्ही असे का बरं बोलता. माझ्या पत्नीचा मोठा आवाज ऐकून सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. गाडीही थांबली काय झाले असा कंडक्टरचा आवाज आला, तर त्या स्त्रीने कंडक्टरला माझ्या पत्नीचा कथनाबद्दल सांगितले. कंडक्टरने माझ्या पत्नीला विचारलं काय झालं ताई तुम्ही असे का बरं बोलत आहात. तेव्हा माझी पत्नी बोलली, ही बाई माझ्याच वयाची आहे तिचा पती माझ्याच पतीचा वयाच्या आहे. तरीही सुशिक्षित दिसणारी हि बाई स्वत:ला आता ही लहान बाळचं समजती आहे. माझ्या पतीला काकाजी आणि मला काकू बोलते. अगं स्वत:कडे बघ फुगून फुगा होत चालली आहेस. पिकणारे केस काळे करून आलीस आणि तरुण बनतेस. ही मुलं काय बाजारातून आणली की झाडावरून तोडून आणलीस. हे ऐकताच तिच्या पतीला एकदम लाजिरवाणं झालं. त्याने येऊन माफी मागितली आणि गोष्ट नीपटली. आमच्या पाठोपाठ संपूर्ण बस मधिल यात्री तीला मूर्ख म्हणत तिच्यावर हसू लागले. तिच्या परिवारास नाईलाजाने ती बस सोडावी लागली.
आता दुसरा प्रसंग म्हणजे भाजीवाली, दहीवाली आणि मोलकरीण यासुद्धा अशाच प्रकारे गावंढळपणे बोलल्या. त्यातर गावंढळ होत्याच तरीही त्यांना मी प्रत्युत्तर दिले. भाजीवाली बोलली, "वांगे घ्या काकाची १० रुपये पाव लावलेत" तर मी उत्तरलो आलू कशी दिली काकू. तर ती माझ्यावर चिढ़ली का बरं तर तिला काकू म्हटले म्हणून. म्हणू लागली तुम्हाला स्त्रियांशी बोलण्याची शिस्त नाही तर मी बोललो तुला तरी आहे काय? आता बोलल्याप्रमाणे उरलेल्या दोघींबरोबर असाच वाद झाला.
त्या मित्रहो तुम्ही सांगा कुणाला मानसन्मान देणे ही फारच चांगली गोष्ट आहे परंतु त्यालाही काही मर्यादा आहे, काहीतरी अटी आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे मोठ्यांना मान देणे आणि लहानांना प्रेम देणे ही आपली संस्कृती आहे. हीच बाब जेव्हा आपल्या परिवाराची असेल तर आपण आपल्या संस्कृती प्रमाणेच वागतो बोलतो. परंतु तीच बाब जर अनोळखी व्यक्तीबद्दल असेल तर तेथे का बरं माती खातो. ती बसमधील स्त्री सारख्याच वयाच्या तिच्या पतीला अहो काहो आणि जर तिचा भाऊ असेल तर त्याला दादा भाऊ वगैरे बोलत असेलच आणि जेव्हा परपुरुषाची बाब आली तर तिथे तीने माती का बरं खाल्ली. तसाच या उरलेल्या स्त्रियांचे जसे त्या अनाडी गावंढळ असतील तरी स्वत:च्या नात्यातील व्यक्तींशी अशा बोलतील. म्हणतात ना पुरूषांना त्यांचा पगार आणि स्त्रीला त्यांचे वय विचारू नयेत. हि जरी म्हण असेल तरी पुरुषाला त्याच्या पगार कधीही विचारु शकतो, परंतु स्त्रियांबद्दल ही अट लागूच असते. स्त्रिया जेव्हापर्यंत वृद्ध न होऊन जात किंवा मनापासून स्वत:ला परीपक्व मोठे मानत नाहीत तोवर त्या तरुण असतात. परंतु दुसर्‍यांचं काय त्याठिकाणी स्त्रियांना हे भान तर ठेवायला हवा. आपले वय काय, पुढच्याचं वय काय, वयोमर्यादेनुसार वेगवेगळे नाते आणि त्यांचे नाव उपलब्ध आहेत. माझी पत्नीही एक स्त्री आहे परंतु तीची विचारस‍ारणी वेगळी आहे, परिपक्व आहे. तिला माहीत आहे सन्मान देण्याच्या नावाखाली ती स्त्री सर्रास माझा अपमान करून राहिली आहे. स्त्रियांसाठी त्यांचा सख्खा भाऊ लहानपणापासून तर मरेपर्यंत भाऊच असतो तो कधी काकाजी होत नाही तसेच परपुरूष पुढे आला तर त्यांना दादा भाऊ तर बोललं पाहिजे. अहो त्या पुरुष तर पुरुष स्त्रियांना सुद्धा अशाच अपमानस्पद बोलून त्यांचा सार्वजनिक स्थळी हासा उत्पन्न करतात. त्यांचा सोबतला जर वर म्हटल्याप्रमाणे सुशिक्षित गाढवं असले तर मानसन्मान याचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही.
मित्रांनो काही लोकांची मानसिकताच खासकरून स्त्रियांची, कारण नट्टा फट्टा हा पहिला मान स्त्रियांच्याच असतो. याला अपवाद आता काही पुरुषसुद्धा झाले आहेत. जस जसे वय वाढते तसे चेहराही जठर होत जातो. आपले वय कमीत कमी दिसावं म्हणून दाढी आणि नंतर मिशी कापून क्लीन शेव बनून फिरतात. पण चेहरा तो चेहराच असतो अहो माणुसकीच बदला. प्रत्येक वयाच्या प्रत्येक मनुष्यासाठी जोडीदार हे ठरले आहेत. आपण लागण्याचा वयाचे झालो तेव्हा काय आपण एखाद्या बालिकेशी लग्न करतो काय, तसेच वृद्ध झालो तर तरुणीबरोबर लग्न करतो काय. काही अपवाद आहेत त्यांनी लग्न केले आणि करतात. काय त्या बालिकेने किंवा तरूणीने स्वसंमतीने ते केलेले असते. याला म्हणतात सृष्टीचक्र आणि सृष्टीच्या नियमांना तोडणे.
माझ्या मते तर मनुष्याने आपल्या वर्तमानात जगलं पाहिजे. जे भेटेल ते हसत हसत स्वीकारलं पाहिजे. ज्या वेळेस भेटणाऱ्या वस्तूच्या, स्थितीचा त्याचवेळेस उपयोग करायला हवा. साधं उदाहरण देतो उन्हाळ्यात खाण्यास आंबे मिळतात. तेच एक आंबा जोवर खाण्याजोक्ता आहे तेव्हच खाल्ल्यावर त्याचा आस्वाद भेटतो कि एक महिन्यांत त्याला खाऊ असे म्हणून ठेवून दिल्यावर तो आस्वाद मिळेल काय. अहो तो तर दोन दिवसांत सडून जाईल. तसेच तो आंबा त्याचा टिकण्यापूर्वीच खातो म्हटलं तर तो कच्चा असतो तेव्हाही त्याचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकत नाह। म्हणून मनुष्याने त्याच्या बालपणाचा आस्वाद बालपणात, तरूणाचा आस्वाद तरुणपणात आणि वृद्धापणाचा आस्वाद वृद्धपणी घ्यायचा. शिवाय त्यासाठी झुरण्यात आणि पश्चाताप करण्यात कदापी तो क्षण गमावला नाही पाहिजे.
परंतु मित्रहो काही व्यक्ती हि संवेदनशील असतात, तसेच आपण सर्वच संवेदनशील आहोत. तर अशा सुशिक्षित गाढवांमुळे सगळ्या लोकांपुढे त्याच्या अस्तित्वाबद्दल व्यंग होऊन जे हास्य तयार होते. याचा त्याला फार मोठा मानसिक आघात होत. त्या बसमध्ये माझ्या बाजूने माझी पत्नी उभी होती. सोबत संपूर्ण बसमधील जागरूक प्रवासी होते म्हणून तो अपमान मी सहन करु शकलो. मला सगळ्यांचे समर्थन लाभले आणि माझा आत्मविश्वास उंचावला आणि सोबतच त्या स्त्रीचा व्यंग होऊन तिचे हास्य तयार झाले. तिला तर माहीत नाही, परंतु तीचा जागरूक पतीला शर्मेचे पात्र व्हावे लागले. अशा परिस्थितीत जर एखादी संवेदनशील व्यक्ती फसली आणि तेथे सभोवताल असेच सुशिक्षित गाढव असतील तर तेथे होणारा त्या व्यक्तीचा अपमान त्याच्या आत्मविश्वासाला फारच घातक ठरतो. त्याच्या आत्मविश्वास संपूर्णपणे ढासळून जातो. तो मानसिक आजाराच्या स्वाधीन होऊन डिप्रेशन, अवसाद मध्ये जातो. तर मी त्या लोकांकडून खासकरून माझा आया बहिणी आणि मैत्रिणींना आवर्जून विणती करतो जर कधी आपण अशा परिस्थितीत सामील झाल्यावर आपली सद्सदविवेक बुद्धी वापरून योग्य ते कार्य करा किंवा योग्य ते बोला. काहीही बोलण्याआधी स्वतःच्या वयाचा आणि दुसऱ्याच्या वयाचा आणि मान सन्मानाचा विचार जरूर करा.
मित्रांनो मी जेव्हा हा विषय लिहिण्यास घेतला तेव्हा तुमच्या ओठावर हास्य आणायला बघितलं. परंतु मला माफ करा मी चुक होतो. कुणावर हसून व्यंग्य करून हास्य उत्पन्न होत नाही ते होते नैसर्गिक स्वच्छ मनातून. आता तुम्हाला अधिक गंभीर न करता तुमच्या निरोप घेतो. हसा हसवा आणि आनंदित रहा.
धन्यवाद
स्वलिखित
गजेंद्र गोविंदराव कूडमाते

0 

Share


गजेंद्र गोवींदराव कुडमाते
Written by
गजेंद्र गोवींदराव कुडमाते

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad