सोबती नाही कुणी तरी
एकटा मी चालतो
चंद्र तारे अन नभाशी
रात्र रात्र बोलतो
सरले जरी आयुष्य सारे
मी संकटांशी झुंजतो
जीवनाची गीत माला
शब्द शब्द गुंफतो
सरला जरी अंधार सारा
रात्र तरी बाकी दिसे
दिनकरच्या सोबतीत फक्त
आशा उद्याचीच असे
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you