Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष्यातील आर्थिक गरिबी चालेल पण संस्कारची दिवाळखोरी नसली पाहिजे
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
22nd Jan, 2023

Share

*आयुष्यातील आर्थिक गरीबी चालेल पण संस्कारांची वैचारीक दिवाळखोरी नसली पाहिजे*
आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काहिच सोबत आणत नाही . वडिलोपार्जित काही असलं तर तेही वारसदार संख्येनुसार आपल्या वाट्याला येत . आणि शेवटी जाताना तसं सोबत घेऊन जाण्यासारख कहीच नसतं .जन्मा नंतर आपण ज्या ज्या पद्धतीने जे जे काही मिळवल त्या पैकी काय किती राहिल आणि परत कसं जाईल हे वेळ ठरवते . आपण माझ माझं करत रिकामं ओझ घेवुन फिरतो . मुळात टिकण्यासारख असतं ते चरिञाने निर्माण झालेली किर्ती हि अजर अमर असते . म्हणून आपण जीवनात काय मिळवायचं याचा विचार केला तर पैसा संपत्ती या पेक्षा किर्तीवंत होण कधीही उत्तम . भलेही धन संपत्ती कादचित नसेल आपल्याकडं नसेल हरकत नाही पण आपण संस्काराने वैचारिक दिवाळखोरी मध्ये नसलं पाहिजे.धनसाठा किती आहे या नुसार जरी गरिबी श्रीमंती ठरत असली तरी परिस्थिती ने आपण गरिब असलो तरी घाबरायचे काही कारण नाही. कष्ट करण्याची मानसिक तयारी असेल तर अन्न वस्त्र निवारा कमी पडत नाही .पण जीवनात पैश्याची श्रीमंती कदाचित नाही लाभली तर संस्काराने विचाराने जन्मोजन्मी चे गलिच्छ असता कामा नये . मुळात संपत्तीच्या वापरानुसारच संस्कारांची वैचारिक गरिबी, श्रीमंती ठरत असते . लोक हितकारक कार्यासाठी अथवा स्व कल्याणासाठी संपत्ती खर्च झाली तर वैचारिक श्रीमंती टिकुन आहे असं समाजयच. आणि जेव्हा संपत्ती हि लोक विघातक अथवा स्व विघातक कार्य साठी खर्च होईल तेव्हा वैचारिक दरिद्रता आहे .असं समजावं धन, द्रव्य,पैसा ,हा अंनतकाळाचा सोबती नाही.धनसंपत्ती पेक्षा हि श्रेष्ठ आणि उत्कृष्ट संपदा हि संस्कारांची आणि वैचारिक संपदा आपल्या जवळ मोठ्या प्रमाणात मुबलक असली पाहिजे. जवळ आर्थिक सुबत्ता नसु द्या हरकत नाही . तसंही संपत्ती हि चंचल अस्थिर असते .ती कधी येईल व कधी जाईल.तसेच कशा रूपाने येईल आणि कशी निघून जाईल हे खात्रीने कोणालाही सांगता येणार नाही.पण आपण संस्काराने वैचारिक सदन असलच पाहिजे .अर्थिक दृष्टीने गरिब असणं किंवा परस्थितीनुरूप गरिबी येण या मध्ये फार काही गैर नाही कारण गरिबी श्रीमंती हा प्रारब्धाचा निसर्गाचा खेळ आहे.या खेळाला कोणालाही समोर जावा लागु शकत.कोण कधी राजा होईल आणि राजाचा कधी रंक होईल याचा वेळेशिवाय इतर कोणालाही थांगपत्ता लागत नाही.संपतीवर अंहकार करण्याच काही कारणं नाही. व संपत्ती नसल्या कारणाने दुःख व्यक्त करण्याची आवश्यकता नाही.पण संस्काराने दरिद्री असणं किंवा वैचारिक गरिबी हि नसलीच पाहिजे. आर्थिक गरिबी हि फार परिणाम कारक नसते.तस पाहील तर माणसाच्या आयुष्यात सर्वसाधारण गरजा ह्या मर्यादित असतात. पण याचा गरजा जेव्हा भौतिक स्वरूप धारण करतात तेव्हा मात्र मग आकड्यांचा खेळ प्रभावी ठरतो . सर्व साधारण व्यक्तिला सुद्धा आपण गरिब आहेत असं जाणवतं वास्तविक जो बारा तास कष्ट करेल त्याच्या अन्न वस्त्र निवारा ह्या मुलभूत गरजा व्यवस्थित रित्या पुर्ण होणार नाहीत असं होऊ शकत नाही.महणुन गरिबी हि व्याख्या प्रत्येकाच्या नजरेत वेगवेगळी असु शकते. पण संस्कार आणि वैचारिक गरिबी आपल्याला आयुष्यातुन संपवते .आणि मुळात आपल्याकडे संपत्ती प्रचंड प्रमाणात असली आणि आपण संस्काराने वैचारिक गरिब असु तर ती संपत्ती आपण विघातक कार्य साठी वापरू हे निश्चित . आपण आपल्या वारसांना जी संपत्ती कमावुन ठेवतो त्या मध्ये आर्थिक संपत्ती पेक्षाही संस्कारांची वैचारिक संपत्ती त्यांना प्रदान करता आली तर त्यांच्या साठी हे लाभादायक ठरेल .धन द्रव्य संपदा हि आपल्या दोन पद्धतीने मिळते एक वडिलोपार्जित आणि दुसरी आपण स्वतः अर्जित केलेली पण विचारांची आणि संस्कारांची सुबत्ता हि आपल्याला कमवावी लागते .आणि हिहसंपदा कमविण्यासाठी अध्यात्म मार्ग हा सर्वतम मार्ग आहे. आपल्या जीवनात संस्कारांची वैचारिक गरिबी येऊ देयची नसेल तर आपण सदैव सात्विक ज्ञान मार्गाची कास धरली पाहिजे.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad