Bluepad | Bluepad
Bluepad
कलियुगात ज्ञानाची अजिबात कमी नाही पण दुर्दैव ज्ञान वापरात ईमानदारी नाही
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
22nd Jan, 2023

Share

*कलयुगात ज्ञानाची अजिबात कमी नाही पण दुर्दैव ज्ञान वापरात ईमानदारी नाही*
कधी कधी वास्तवाच पण दर्शन घडलं पाहिजे आणि आवश्यक आहे.आरसा जेव्हा खरं रूप दाखवेल तेव्हाच आपण चेहरयाची काळजी घेणार किंवा त्यावर चिंतन करणार चिंतन हे महत्वाचं असतं .आणि वास्तव वादी चिंतन हे तर कधीपण फलदायी ठरत .आपल्या कडे असणारी कोणत्याही गोष्टीची उपलब्धता हि कधीच महत्वाची नसते तर वापरातील नितिमता, ईमानदारी हि परिणाम निश्चित करत असते . म्हणून आपल्या कडे कोणतीही गोष्ट किती प्रमाणात उपलब्धआहे .आणि तिचा वापर आपण कसा करतोय त्या वर सगळं काही अंवलबुन असत.तस पहिलतर असणं आणि वापरणं या मध्ये अंतर असतंच . आणि हे अंतर जितकं जवळच असतं तितकेच परिणाम पण योग्य येतात आणि हे अंतर जितके जास्त तितकेच अनपेक्षित परिणाम येत असतात. हे वास्तव आहे.म्हणून आपल्याकडे काय किती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यापेक्षा वापरातील ईमानदारी हि कधीही महत्वपूर्ण ठरते .आणि हिच बाब सध्या महत्वाची आहे.जर ज्ञानाच्या वापरात ईमानदारी चा वापर असेल तर ते ज्ञान ब्रह्मज्ञान ठरत . आणि ज्ञान वापरात ईमानदारी नसेल तर मग मात्र ते ज्ञान फक्त तेवढ्या पुरता देखावा ठरतं.मुळात सत्याचा स्वीकार करण्यासाठी पुरुषार्थ लागतो . सत्य सहजपणे कोणीही स्वीकारू शकत नाही.आणि हाच पुरुषार्थ प्रत्येका मध्ये निर्माण झाला पाहिजे. सत्याची कास धरण हे कधीही उत्तम असत.पण क्षणिक लाभापोटी,मोहासाठी, लालसेपोटी , स्वार्थ साठी आपण कधी कधी जरी मार्गचुकुन सत्या पासून थोडे जाऊ शकतो जाण्या मध्ये फार गैर नाही पण तिथंच रमण हे घातक अहितकारक असल्याने लवकर जागृत होऊन पुन्हा सत्याच्या ईमानदारी च्या सद मार्गावर परतण हे आवश्यक आहे.महणुन फार काळ सत्यापासून दुर राहण हे कधीच हितकारक ठरत नाही .जरी जीवन मध्ये आपला पथ मार्ग चुकला तरी सुद्धा आपण पुन्हा सत्याच्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी सत्य मान्य करणं हे गरजेचं असतं .सत्य मान्य केलं नाही तर आपण असत्यावर स्वार होऊन एवढ्या दुर वाहुन जातो. कि पुन्हा आपला परतीचा मार्ग बंद होतो . म्हणून सत्य हे जरी कटु असलं तरी ते वास्तवाचं दर्शन घडविणार असतं .सध्याच्या विद्यमान युगाचा म्हणजे कलयुगाचा जर आपण विचार केला तर सगळीकडे ज्ञानाचा महापुर ओंसाडुन वाहतोय पण नेमकं ईमानदारीची कोरड पडली आहे हे किती विरोधाभास निर्माण करणारं चित्र आहे .सर्व क्षेत्रात अगदी सृष्टी च्या , काण्या कोपरयात आपण जिकडे नजर फिरवु तिकडे म्हणजे सगळीकडे फक्त ज्ञान उपदेशच पाह्यला मिळतात .म्हणजेच ज्ञान पृथ्वीवर कमी नाहीच पण हेच ज्ञान उपदेश वास्तवात वापरताना फार कमी लोक दिसतात .मग समुद्रा एवढं विशाल ज्ञान सृष्टी वर असुन देखिल उपयोग काय तर नगण्य म्हणजे फार कमी प्रमाणात होत आहे. समाजाच्या विविध पातळीवर तसेच शोशल मध्यावर वर तर ज्ञानाचा महापुर ओंसाडुन वाहतोय .मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्ञान साठा उपलब्ध असताना देखील सामाजिक पातळीवर जीवनात ज्ञानाचा प्रभाव आणि उपयोग होताना दिसत नाही. कारण फक्त ज्ञान असुन चालत नाही तर ज्ञाना सोबत ज्ञान वापराताना ईमानदारीची आवश्यकता आहे.तेव्हाच ज्ञानाचा योग्य सदउपयोग होतो .कालयुगात ज्ञानाची नाही तर ज्ञान वापरात ईमानदाराची कमी आहे .ज्ञान ज्ञात असण आणि त्याचा वापर करणं या मध्ये खुप मोठं अंतर असतं.ज्ञानाचा कृतीशील वापर जीवनात झाला पाहिजे .पण बहुतांश वेळा असं होतं नाही आणि मग हे ज्ञान फक्त पोकळ वारकरणी ठरत . वास्तविक ज्ञान हे पोकळ ठरू देयच नसेल तर ज्ञाना सोबत ज्ञानाचा इमानदारीने वापर होण गरजेच आहे तेव्हा खरया अर्थाने ज्ञानाची किमया सिद्ध होते . म्हणून कृतीशीलता हि खूप महत्वाची असते. तेव्हाच सृष्टी वर असणारी ज्ञानाची गंगा आपल्याला पावन करेल आणि आपल्याला पण जन्मोजन्मी च्या अज्ञानाच्या चिखलातुन बाहेर पडुन मुक्त झाल्या सारखं वाटेल . आणि सृष्टी वरील ज्ञानगंगा लोक उपयोगी ठरेल नाही तर जशी आपण विद्यमान गंगा हि प्रदुषित करून मलिन केली आहे .तशीच अवस्था ज्ञानाची पण झाली आहे . सृष्टी वरील ज्ञान उपयोगी ठरण्यासाठी ज्ञान वापरामध्ये ईमानदारीची आवश्यकता आहेच . म्हणून कलियुगात ज्ञानाची कमी अजिबात नाही पण वापरत ईमानदारी नसल्याने पाहिजे तसा लाभ होत नाही. म्हणून हि परिस्थिती बदलायची असेल तर ज्ञान वापरात ईमानदारी वाढली पाहिजे आणि हि आजच्या युगाची गरज आहे.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad