Bluepad | Bluepad
Bluepad
पाल, झुरळ आणि आम्ही
anant joshi
anant joshi
22nd Jan, 2023

Share

पाल आणि झुरळ यांना खरंतर राष्ट्रीय किटक जाहीर करायला हव सरकारने अस माझ ठाम मत आहे. कोणतीही गोष्ट राष्ट्रीय ठरविताना ती राष्ट्रात प्रत्येकाच्या घराघरात, आणि मनामनांत वास करणारी असावी हा निकष लावला पाहिजे. आणि हा निकष अगदी तंतोतंत पूर्ण करणारी प्रत्येकाच्या घराघरात सहजगत्या आढळणारी (पेस्ट कंट्रोल केल तरी), प्रत्येकाच्या मनावर भीतीच अधिराज्य गाजवणारी ही उपरोक्त मंडळी करावी सरकारने जाहीर राष्ट्रीय म्हणुन, बघा म्हणजे मी आपले सुचविले, विचारस्वातंत्र्य माझे.
आता ही मंडळी घरात असली तर प्रत्येकाच्या आयुष्यात यांच्या बाबतचे अविस्मरणीय किस्से नक्किच असणार अगदी. माझ्या पण आयुष्यात आहेत यांच्या आठवणी पण आता मोरपिशी आठवणी नाही तर या आठवणी आहेत झुरळपायी आठवणी. आता हा कोणता नवीन शब्द, तर ज्यांच्या अंगावरून झुरळ थोड चालत गेल आहे त्यांना हा शब्द अगदी चपखल आहे अस वाटेल, आठवुन देखील काटे आले की अंगावर. खर हीच आठवण झुरळ नुसते दिसले की मनात येते आणि यांची दहशत मग आपल्यावर राज्य करायला सुरुवात करते. बर बंदुकीने यांना तुम्ही माराल तर प्रत्येक वेळेला काही तुम्ही अशी शस्त्र बरोबर (झुरळ मारण्याचा स्प्रे वैगरे) घेवुन फिरत नाही ना, की चला टॉयलेट मध्ये जात आहात, तर पोलिस जसे दबा धरून एका हातात बंदूक वर करून दरवाजा उघडतात, दुसर्‍या हाताने, आत कोणी लपला आहे त्याला पकडण्यासाठी अगदी तस. बर गेलो आपण तयारी करून तर हा काय घाबरत नाही तुमची शस्त्र बघुन शरणागत व्हायला, उडी पण मारू शकतो हा बाबा आपल्या अंगावर थोड उडता येत याचा फायदा घेवुन. त्यामुळे जगात सगळ्यात जास्त मोठा दहशतवादी हाच असावा जो आम्हा शुरवीर, रणरागिणी, झाशीची राणी वैगरे वैगरे असणार्‍या तमाम महिला मंडळांला अस केविलवाणे करू शकतो.
माहेरी आणि आता सासरी पण झुरळ दिसले कुठे तर मी त्या ठिकाणी अजिबात एकटीने प्रवेश करीत नाही, एकटी असताना गाठलेच त्याने तर प्रचंड आरडा ओरडा आणि धावपळ आणि त्याबरोबर बाकीच्यांची धावपळ मला बघायला, काय झाले एवढे ओरडायला हिला आणि झुरळ बघुन ओरडली हे समजले की मग सहानुभूती वैगरे सगळ सोडुन अतिशय तिरस्कारयुक्त कटाक्ष सगळ्यांचे आणि आजूबाजूच्या लोकांना त्रास झाला असेल तुझ्या अश्या ओरडण्याने याबद्दल ऐकावी लागणारी बडबड ठरलेले. पण पण त्या झुरळाला कोणीच काही बोलत नाही, आणि तिथेच असेल तो मठ्ठ अजुन तर मग नवरा, मुल कुंचा, सुपले घेवुन त्याला पकडुन बाहेर फेकून येतात, नवरा तलवार घेतल्यासारखा कुंचा, ढाली सारखी सुपली हातात घेवुन पुढे आणि मागे मुल आणि रांगेत सर्वात मागे दरवाजाच्या बाहेर मी अस एकंदरीत सगळे प्रकरण असते. सगळे खुश असतात त्या मेल्या झुरळासकट... चलो भाई कोई तो है. संशय आहे मला नंतर बसुन पार्ट्या तर करत नसतील ना ही झुरळ मंडळी आपल्या नवऱ्यांसोबत, उगाच येत बरका अस कधीतरी मनात. Oggy and three cochroches cartoon सत्य परिस्थिती वर आधारित आहेत आणि एखादी स्त्री लेखिका ते कथानक लिहीत असावी का हा भाबडा प्रश्न आहे माझा.
तर हा किस्सा झुरळांचा बरका.
पण जर घरात पाल दिसली कुठे तर नेमकी उलटी परिस्थिती असते.
म्हणजे ती रांग आहे ना झुरळ मारण्याची ती पूर्ण reverse गियर मध्ये मग. मी ढाल, तलवार घेवुन पुढे, मागे मग सगळी मंडळी. माझ्या अंगात मग झाशीची राणी संचारते, (घोडा नसतो तेवढा फ़क्त) , मागुन running commentary ईकडे, ईकडे, तिकडे, तिकडे बस एवढीच मदत सैनिकांची मला, फ्रीज मागे गेली ती बया तर फ्रीज हलवायची पण हिम्मत करत नाही कोणी पुढे यायची, मग मी पुढे सरसावले की मागुन येणार सर्व मंडळी मदतीला पण मागे राहूनच मदत, खुप पळापळ, खटाटोप करून शेवटी बरेचदा यशस्वी होते मी सावज पकडण्यात, पकडली त्या सुपल्यात, वर कुंचा दाबुन ठेवुन तर तिला लांब फेकायचे तेवढे बाकी असते, तरी सर्व मंडळी अगदी 5 5 फुट लांब उभे राहुन फ़क्त दरवाजा, खिडकी कुठे आहे ते सांगणार खाणा खुणा करून, जणु काही बोलले तर आवाज कळेल तिला आणि येईल त्यांच्या अंगावर ती धावून असे बघत असतात. काम फत्ते झाल की मला अगदी अस मुठभर मांस चढलेले असते, जे खरतर कमी होण माझ्या सारखीसाठी चांगले आणि योग्य, पण आपले पूर्वज अश्याच म्हणी तयार करून ठेवल्यात त्यांनी सरसकट सगळ्यांसाठी एकच, थोड तब्येत नको का विचारात घ्यायला हवी होती त्यांनी तेव्हा, तर असो.
एकंदरीत नवरा बायको कसे एका रथाचे दोन चाक आहेत वैगरे म्हटले जात तसेच आमच्या घरात पाल आणि झुरळ एका रथाची दोन चाक बरका मंडळी. झुरळाला मी घाबरते अस मला कोणी चिडवू शकत नाही कारण पालीला बाकीची मंडळी घाबरतात, आणि अस दोघ मिळुन Balance सांभाळतात आमच्या घरातील भितीरुपी रथाचा.

0 

Share


anant joshi
Written by
anant joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad