PMS ( Pre Menstrual Syndrome ) म्हणजे काय??
PMS असल्यास मासिक पाळी येण्याच्या दोन आठवडे आधी मानसिक अवस्था अत्यंत वेदनादायी असते...
मासिकपाळी येण्याच्या आधी मानसिक आणि शारिरीक अवस्थेवर परिणाम होत असतो.
PMS ची लक्षणे कोणती?
थकवा,चिडचिडणेपणा, संताप,संवेदनशील होणे,अन्नपदार्थ सेवन करण्यावर नियंत्रण नसणे ..
PMS असलेल्या महिलांमध्ये साधारण ही लक्षणे दिसून येतात,,
शरीर जड वाटणे, छाती भरून येणे, मानसिक तणाव, नैराश्य,आत्मविश्वास कमी होणे,मुड बदलत राहणे याचाही अनुभव काही महिलांना येतो,,,,
PMS ची समस्या का उद्भवते?
मासिकपाळीत हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही लक्षणे दिसून येतात,,
दर महिन्याला वेळेवर मासिकपाळी येणा-या महिलांमध्ये महिन्याच्या मध्यात अंडी सोडली जातात,,
तेव्हापासून मासिकपाळी सुरू होईपर्यत प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोन्सची पातळी वाढते,,
हया हार्मोन्सचा मेंदूवर परिणाम होत असल्याने महिलांच्या वर्तवणूकीत फरक होऊ शकतो,,
PMS चा स्तर कसा ओळखायचा??
रक्ताची चाचणी करून PMS चे निदान होऊ शकते,,
PMS वर उपचार कसे करायचे??
सुरूवातीला औषधे न घेता इतर गोष्टींवर लक्ष गरजेचे आहे,,
खाद्य पदार्थामध्ये बदल, जीवनशैली बदलणे, जेवणाच्या वेळेचे योग्य नियोजन केल्यास दिलासा मिळू शकतो,,,,
Refined Carbohydrates चा वापर कमी केला पाहिजे ,,उदा.तांदूळ,पांढरा ब्रेड,मिठाई, बटाटे इत्यादी
Vitamins B6,Magnesium, Multivitamins च्या गोळया वापरल्यास PMS ची लक्षणे कमी होतील,,,,
हया औषधांनी त्रास कमी झाला नाही तर हार्मोन्स थेरपी ही उपचाराची पुढील पायरी आहे...
हार्मोन्स थेरपीचा उद्देश्य बीजांडकोशाची रिलीज रोखणे हा आहे👍
✍करिश्मा किशोर ✊