Bluepad | Bluepad
Bluepad
अडुळसा
भारती थोरात
19th Jan, 2023

Share

रंग नवे चाराक्षरीचे.
अडुळसा.
द्वीसहस्त्र ,
पुरातन.
कार्य याचे
चिरंतन. १
झुडपाचे
रूप असे.
बांधावर
वाढतसे. २
भाल्यासम,
पल्लेदार.
शोभतसे,
पर्णभार. ३
पांढरट,
निळसर.
फुलोराही,
मनोहर. ४
मूळ, खोड,
फुले ,पान,
फळे याची
गुणवान. ५
श्वसनाचा,
दाह शमे.
याच्यापुढे
अक्षय नमे. ६
कुष्ठभोग
संपवतो.
मुख रोग,
निवारतो. ७
तृषा, दमा,
ताप ,वांती.
गुणकारी,
रोग शांती. ८
स्मृती भ्रंष
काविळीला.
गुण येई.
उन्हाळीला. ९
अतिसार ,
अमांश्यात,
बरा करी.
मूत्राघात.
बहुगुणी.
रामबाण
आयुर्वेदी
जाण ज्ञान.
भारती थोरात

175 

Share


Written by
भारती थोरात

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad