नुकताच परदेशी ट्रीपला गेलो होतो.ट्रीपमधे एका सहप्रवाश्याचा अचानक,आकस्मिक आणि अनपेक्षित म्रुत्यु झाला.या घटनेमुळे माझ्या डोक्यात आलेले काही विचार.
त्यांच्या बरोबर चार पाच नातेवाईक होते. अचानक आणि अनपेक्षित आलेल्या म्रुत्यु मुळे कुटुंबियांसमोर आता काय करायचे असा प्रश्न उभा राहिला.
दोन पर्याय होते. एक म्हणजे अगदी सख्या नातेवाईकांनी तिकडे जाऊन, तीथे बरोबर असलेल्या नातेवाईकांसमवेत तीथे उपलब्ध असलेल्या पर्यायानुसार अंत्यविधी करणे.
दुसरा पर्याय म्हणजे पोस्टमार्टेम करुन डेडबाँडी वैद्यकीय पध्दतीने पँक करून विमानाने म्रुत व्यक्तीच्या घरी पाठवणे.याला चार पाच लाख खर्च येतो. अस म्हणतात कि अशा प्रकारे पँक केलेली बाँडी अंत्यदर्शनासाठी सुध्दा उघडता येत नाही. शिवाय आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय बर्याच परवानग्या लागतात.
माझ्या डोक्यात आलेला तिसरा पर्याय देहदान, गेलेल्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुबियांंना मान्य असेल, आणि त्या देशात, राज्यात तशी व्यवस्था असेल तर जवळच्या मेडिकल काँलेजमधे डेडबाँडी देणे.
अशा वेळी आजूबाजूचे नातेवाईक आणि परिचित यांचे विचार, सल्ले अपरिहार्य असतात. त्यापैकी काही लोकांना डेडबाँडी चा प्रवास, त्यातील कायदेशीर अडचणी आणि खर्च याविषयी काहीही माहिती नसते,आणि काही लोकांना नुसताच सल्ला किंवा ईच्छा व्यक्त करायची असते.त्यांचा सक्रीय सहभाग काहीही नसतो.
शेवटी हा अगदी खाजगी, कौटुंबिक, आणि भावनिक विषय असतो.जिवंतपणी भेटणे,बोलणे यापेक्षा डेडबाँडी बघण्यात लोकांना काय समाधान असते ते मला समजत नाही
अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार या गोष्टी समाज निर्माण झाल्यावर आलेल्या असाव्यात. त्यापूर्वी आस्तित्वात नसाव्यात.