#नोझी. मीच माझी प्रथम बेस्ट फ्रेंड, हे पाच सहा वर्षा पूर्वी कुणी मला शिकवून गेलं, प्रसंगारूप मला त्याच महत्व पटलं. नि खरंच हळू हळू का होईना मी स्वतःची काळजी घेऊ लागले. उभ्या आयुष्या त बालपणा पासुन दुर्लक्षित केलेल्या स्वतःच्या आवडी निवडी जपु लागले.समोरच्या प्रसंगा ना संयमाने सामोरी जाऊ लागले. कुणी अध्यात्मिक हितचिंतकांनी मला सांगितले, जास्त पती विरहात दुःखी होऊन रडत बसू नको. भगवद गीता वाच. ते कुठे शोधून सापडणार नाहीत. तुझ्या मुलानं मध्ये च त्यांना पहा. माझ्या २०१४च्या पहिल्या फॅक्चर च्या वेदना तुन उमगले आयुष्य काय असत. आणि आता २०२२ च्या मे महिन्या त झालेल्या डाव्या मनगटच्या लीगा मेंट फॅक्चर द्वारे उमगल प्रत्येक ऑर्गन किती किमती आहे, जीवनाला लाचारीच रूप येऊ नये. म्हणुन आवश्यक अन्न घटक खाऊन तंदुरास्त रहा. व्यायाम, आनंदी मन, ईश्वरी आराधना करत मनाचे आरोग्य सदाहरीत ठेवा.मग जीवनाच्या लहान, मोठ्या परीक्षा सहज उत्तीर्ण व्हाल, एकटी च्या पाय वाटेने ही मग घराचे मग नव्याने घराचे नंदन वन कराल.म्हणुन पहिल्यांदा स्वतः वर प्रेम करत, स्वतःला जपत स्वतःचे मित्र व्हावा. ईश्वरी वरदान प्राप्त होऊन तुम्ही स्वतः चैतन्य मूर्ति झालात की आपोआप सुंदर नात्यान चा गोतावळा तुम्ही प्राप्त करु शकता. नि आनंदाने स्वयंभु होऊन जगू शकता कुणावर ही भार न होता. शेवटी काय देह देवाचे मंदिर. त्याची करु नका अबाळ. जर. हवी असेल आयुष्याची सुखी संध्याकाळ.होत स्वतःचे स्वतः मित्र, तरच निरोगी राहतील गात्र. ही माझी ताऊन सु्लाखून निघालेली आयुष्या ची संध्याकाळ आता मात्र, तुम्हा सर्व गोड़ मैत्र परिवारात आनंदात, सुख शांतीत व्यतीत होत आहे, याचा खुप आनंद आहे.हे दालन आभासी. मैत्री चे जरी असले तरी सुंदर, मनाला नवसंजीवन देणारे. एकमेकांन कडून काही तरी शिकयला मिळते. प्रत्येकाची गॉड गिफ्ट फेसबुक च्या प्लॅट फॉर्म वर उलगडली जातात. नवनवीन अनुभव,वाचायला,कला पाहायला मिळतात. असे मैत्र जिवाचे सुख प्राप्त करायचे असेल तर आधी स्वतःचे मित्र व्हा. स्वतः ची काळजी घेत देवाच्या मंदिराची छान राखण करा. सुलभा (काव्या )वाघ 🌹. १९=१=२०२३
🌹श्री स्वामी समर्थ सर्वनाच्या आयुष्या ला
देवोत छान छान अर्थ 🌹. शुभ रात्री 🌹🌹.७😄