नमस्कार मित्रानो माणूस हा एक असा जीव आहे ज्यात खूप काही चांगल्या व खूप काही वाईट गोष्टी असतात . तो हव ते सर्व मिळवू शकतो , पण त्या साठी त्याची मानसिक तय्यारी हवी , माणसाकडे एक अशी सकारात्मक ऊर्जा आहे त्या ऊर्जे ने तो काहीही करू शकतो आणि त्याच ऊर्जेला त्याने अनेक नाव धिले आहेत जसे की देव,देवी अल्लाह , गॉड आणि बरेच काही ! पण पहायला गेलो तर ते सर्व एकच आहेत , त्यांना असे काही नाव नाहीतच ते सर्व माणसाने स्वतः ठेवलेले नाव आहेत. ती फक्त एक ऊर्जा आहे ती म्हणजे सकारात्मक ऊर्जा.
त्याच प्रमाणे एक नकारात्मक ऊर्जा ही असते ज्याला आपण माणसाने भूत,प्रेत,आत्मा,जिन,राक्षस आणि असे बरेच काही नाव धिले आहेत .
जेव्हा माणसाच्या अंगात वारे येते देवी देवता येतात ,पीर येतात ,गॉड येतात म्हणजे खरंच ते स्वतः अंगात येतात असे नाही मानवी मेंदू हा संगणका सारखा आहे ज्यात अनेक प्रकारचे deta save असतात आपण जे सर्च करतो तो ते दाखवतो तसेच मानवी मेंदूत ही असे बरेच कल्पनाने भरलेले असतात. ज्याचा आपण जास्त विचार करतो ते आपल्या सोबत घडते .
अंगात वारे येणे हे खोटे नसून हे खरे आहे पण अंगात एखादी शक्ती उतरत नसून तो आपल्या मेंदूने save केलेल्या deta मधून सर्च झालेलं एक input आहे , तसा त्याचा फायदा ही आहे आणि तोटा ही फायदा असा की एखाद्या व्यक्तीला त्याचे आयुष्य एकदम कोंडल्यागत वाटत असेल त्याला मनसोक्त वागता येत नसेल ,त्याला मनसोक्त हसता येत नसेल मनसोक्त रडता येत नसेल तर त्याला वारे येऊन गेल्यावर खूप हलके व बरे वाटते . त्याच्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण होते व तो त्या सकारात्मक ऊर्जेने प्रसन्न होतो पण जर तो जरा जास्तच त्यात घुसला तर तो स्वतः ला ईजा ही करू शकतो .
एखाद्याच्या अंगात जेव्हा भूत शिरतात (ही एक नकारात्मक ऊर्जा आहे) तेव्हा तो वेक्ती फक्त हाच विचार करत असतो की त्याच्या अंगात भूत शिरलेत आणि तसा विचार करू करू तो वेड्यावानी वागू लागतो त्याला असे वाटते की माज्या अंगात भूत आहे मग तो स्वतःला ईजा करू लागतो आणि जेव्हा त्या वेक्तीला एखाद्या धार्मिक स्थळी मंदिर, मशीद ,चर्च मध्ये न्हेला जातो तेव्हा त्याच्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व तो बरा होतो नाहीतर त्या वेक्तीला अस्या एखाद्या वेक्ती कडे घेऊन जातात जो काही लिंबू मिरची किव्हा काही मंत्र वगैरे टाकतो , तेव्हा तो बरा होतो परंतु तो त्या लिंबू मिरची किव्हा मंत्र वगैरे नी बरा झालेला नसतो जेव्हा असे काही त्याच्या सोबत करत असतात तेव्हा त्या व्यक्ती च्या मनात तोच विचार असतो की त्याने तो बरा होईल आणि त्या विचाराने त्याच्या डोक्यातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व तो बरा होतो..
पण मला एका गोष्टी चा दुःख होतो की आपल्या त्या सकारात्मक गोष्टीचा लोकांनी व्यवसाय सुरु केलाय , माज्या अंगात देव येतो मी काहीही करू शकतो , असे जो बोलतो तो खरा चोर असतो तो माणसाची भावना चोरतो , अंगात देवी येती ना तर बिना पैस्याच बर कर म्हणावं त्याला पैसे जो मागतो तो खरा ढोंगी असतो.
पैस्यांसाठी लोक खूप लोकांना फसवतात , काहीही करायला लावतात . तुम्ही काहीही करायचे गरज नाही कसल्याही ही अंधश्रद्धेला बळी पडू नका तुमच्यातली सकारात्मक ऊर्जा ओळखा ,नकारात्मक ऊर्जे ला काडून टाका , तुम्हाला हव्या त्या देवी देवताची पूजा करा अल्लाह ची पूजा करा जिजस ची गॉड ची पूजा करा मंदिरात जा मशीदीत जा चर्च मधी जा आणि सकारात्मक ऊर्जेच भाग बना .
आपले विचार सकारात्मक असले तर सर्व काही मिळत फक्त नकारात्मक विचारांना थोडे लांब ठेवा एवढेच
काही चुकीचे बोललो असेल तर क्षमा असावी