गोड बोलायला वागायला कींवा अनुसरून करून अमलात आणण्यासाठी कोणत्याही उत्सवाची गरज आहे काय? मानसाने मानसाशी नाहमीच अगदीच गोड नाही किमान माणसासारखे तरी वागावे.नीट छान प्रेमाने बोलावे ही माफक अपेक्षा.मानसाने मानुसकी जिवंत असलेल्या मनाने ठेवणे रास्तच आहे मानसनेच मानसाला हिन समजुन तिरस्कार करावा स्पर्शच काय सावली सुद्धा भ्रष्ट समजुन विटाळ मानावा एकुनच एकाद्या मानव समुहाने दूसरया मानव समूहाला खालच्या दर्जाचा समजुन हीन नीच अस्पृश्य म्हणावे ठराविक जातीत विभागलेल्या माणसांना खर तर माणुस म्हणुन घ्यायचा हक्क सुद्धा हिरावला गलिच्छ समजुन गावकुसाबाहेरील हगणदारीत लोटावे.माणसाचा तिरस्कार करावा अगदी नैसर्गिक रित्या निर्माण झालेल्या कोणाही मानव प्राण्याचा अधिकृत हक्क नसलेल्या जल संपत्तीला स्पर्श करणे सुदधा निषिद्ध! असे का?अस्पृश्य म्हणुन गणल्या गेलेल्या जमातीं बद्दल चुकुन कधीतरी, स्वतःला सवर्ण उच्च समजणाऱ्यानने चांगुल पणे हिताचे शब्द सौम्य मवाळपणे उद्गारले त्यांच्यासाठी तोची,सौभाग्याचा दिनु दिवाळी दसर्याचा सन भासावा असल्या मुर्ख भयानक दडपणाखाली अस्पृश्य लोक जीवन कंठत आले अस्पृश्य म्हणुन दूर लाटलेल्या समाजाला हजारो वर्ष सवर्णांची गुलामी सहन करण्यापलीकडे आयुष्याला पर्यायच न्हवता.वर्ण व वंश, जाती धर्म यासारख्या अराजक परिस्थितीतून आमच्या कित्तेक पीडया मार्ग क्रमण करीत आल्या आहेत. हिंदू धर्मातील चालीरीती व परंपरा नियम मुहुर्त रूढी जरा बारकाईने निरीक्षण करून पाहीले तर बरेचसे सण उत्सव सभारंभ सुरू होण्यामागे भिन्न अशा काल्पनिक कथा जोडलेल्या दिसतात.सोबतच देवादी देवांचे युद्ध चमत्कार,जातक कथा पराक्रम पराभवाच्या वृत्तातांसह प्रचलित पंथाचे प्रथाचे उगम स्थान रंजक पणे रंगविले आहे देव गण राक्षस गण,मनुष्य गण प्राणि गन असल्या भाकड कथांमधुन मानवजातीचे विभाजन केले.याचा परिणाम निरनिराळ्या प्रांतातून वेगवेगळ्या स्वरूपात व्यापक सर्वसमावेशक कारणमीमांसा असणारच असा तर्क लावता येतो दुसर्या अर्थाने मानवाच्या वास्तविक दाहकतेचा विचार करून पाहीले तर जातींच्या ऊतरंडी आर्थिक सामाजिक दरी भेदाभेद एकुणच माणसा माणसातील असामान्य भेद विषमता पहायला मिळतात. त्या विरूदध दुसरीकडे भरभरून वाहणाऱ्या श्रीमंतीचे धनी गडगंज अफाट ओंसडून भरलेल्या ईमलयांचे थाट.अलिशान,पाॅश सर्व सोइंनी युक्त राजवाड्याच्या स्वरुपातील घरे राजशाही थाटात रहाणारी माणसे.संपत्तीचा झगमगाट मिरविताना लाखो रुपयांचा क्षणात चुराडा करणारे महाभाग दुसरीकडे नुसताच अंधार भरून वाहणाऱ्या वस्त्या गरीबी भुक अज्ञान अंधश्रद्धा दारिद्र्यात खितपत असलेली माणसं रात्र दिवस कष्ट उपसणारे पुरेशा सुविधा मिळाव्यात म्हणुन मरमर करणारे लोक. दिवसभर राबुन मगच भाकरीला भेटलेले जीव पीडयानपीडया जीवनाशी जगणयाशी संघर्ष करणार्या माणसांची स्थिती एकविसाव्या शतकात तरी पुरेशी बदलली आहे का?चातुर्वर्ण्य मनुवादी व्यवस्थेने मानवाला भयाण दयनीय अवस्थेत नेले. सहाजिकच समाजिक मानसिक आर्थिक कुचंबणा मानमानसात दर्या वाढणे अविश्वास तिरस्कार राग वाढीस लागणे अयोग्य म्हणावे का? वर्षानुवर्ष दारिद्र्यात खितपत पडलेल्या लोकांना कधीतरी चांगले बरे कपडे घालण्याची गोडधोड खाण्याची नीटनेटके राहण्याची आस धरावी यात गौन काय आहे?मनुस्मृतीत मांडलेल्या शूद्राती शूद्रां च्या साठी चे नियमात तर नवे किंवा जरासे बरे कपडे घालणे पायात वहाणे जरीपटका इ.दी गोष्टी वर्ज्य होत्याच त्यासह गोडधोड जेवन तुप दृध खाणे शूद्रां साठी महापाप मानले गेले मग वरील गोष्टी त्या गरीब माणसाने स्व कमाईतून मिळविल्या असल्या तरीही कारण काय तर शूद्रांना संपत्ती जमविण्याचा हक्कच नाही असे यांचे वेद पुराण स्मृती श्रुती गाथा सांगतात.कोणतीही जिवंत *शरीराने जीवंत असुन मेलेल्या मनाची *नव्हे!व्यक्ती हे नियम अमानवीय जहाल कडक आहेत असे गृहीत धरते. त्याही पुढचे पाहु एके काळी शूद्रांनी गळयात मडके नी कमरेला झाडू बांधुन वावरण्याचा हिन किळसवाणा नियम तसेच शूद्राती शूद्र गणल्या जाणार्या लोकांची मुंडकी छाटुन मग लाथेने ऊडवत फुटबॉल समान खेळ खेळण्याची महा निर्घृण अमानुष पदधतीचे जुलुम लागु करणार्या महापराक्रमी म्हणविणाऱ्या बाजीरावाने घृणतेच्या कोणत्या पातळीवरील सीमाररेषेवर ठेवले?मानवाला. मर्यादा इथे संपतेय का अमानुषतेची ?ईतिहासाच्या पानापानातुन सापडणारा अमानवीय रक्तरंजित वृत्तीचा विध्वंस चाळताना विविध रूढी पंरपरा व सन रीतीरीवाज असल्या धाग्यांची गुंतागुंत काहीशी ऊलगडत जाते.हजारो वर्ष वर्षानुवर्ष महीनोन महीने आठवडे दिवस क्षणोक्षणी अनिष्ट रीती नियमांच्या जाचक कायद्याच्या दडपशाहीत जगणार्या मानवांना किमान सणांच्या निमित्ताने तरी गोडधोड जेवन किमान नीटसे आपुलकीचे बोलणारे शब्द ऐकुन आम्ही ही तुमच्या सारखीच माणसे आहोत याची जाणीव नककीच होत असणार किंवा तो क्षण म्हणजे अति सौखयाचा वाटला असेल तर नवल ते काय?असो मी तर हिंदू धर्माचा मनातुन केव्हाच त्याग केलाय कागदोपत्री प्रोसेस सुरू आहे.सण वगैरे साजरे करण्याचा प्रश्नच नाही उत्सव का साजरा करतात त्या पठीमागीचे हेतु ऊददेश कारणे अभ्यासण्यासाठी बरीच तत्वत्ज्ञ संशोधने अभ्यासू मंडळीनी केलेली आहेत अजुनही आपापल्या सोइनुसार सनावारांचे पंरपरा रीतीरिवाज व रूढीचे विच्छेदन लोक करीत असतात मी ही माझ्या तर्कावर विश्लेशन केले.बस!अंजली भालशंकर,🌺 मुठेच्या काठावरून.........🌺 ललितलेखन लवकरच येत आहे.