जिवनात नेहमीच एकसारखी स्थिती असतेच असे नाही. हे जर सत्य स्विकारले तर परीवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. याप्रमाणे आपण जुना कालखंड आठवला तर , एकेकाळी आपले पुर्वज जे मालगुजार , पाटील , महाजन देशमुख , राजे , महाराजे , होते . काहीच्या संदर्भात आज त्यांचे वंशज त्याच परस्थितीत कायम आहेत असे म्हणता येत नाही. कमी अधीक फरकाने सारेच पुर्वजांचे वंशज सामान्य श्रीमंत, सामान्य गरीब किंवा काही अधिकारी तर काही कर्मचारी अशा स्थितीत जिवनात बदल स्विकारला. अशाच प्रकारे जर मेहनतीला महत्त्व आणि प्राधान्यक्रम दिला नाही तर पुढील भविष्यात आजच्या पिढी साठी आई वडीलांनी मेहनत केलीच नाही. तर आजच्या पिढीतील मुले भविष्यात अतिसामान्य परीस्थिती बदलवु शकणार नाहीत पर्यायाने गरीबीचेच जिवन असणार . हे तेच आई वडील समजु शकतात ज्यांनी गरिबी अनुभवायला आली . म्हणुनच सद्यस्थितीत मुलांचे भविष्य भावी काळात डगमगणार नाही . हे कुठे मुलांना कळते . नाहीतर एकेकाळातील गावचे पाटील मालगुजारांची मुले शहरात नौकरीसाठी गेलेच नसते . शहरात दहा वीस हजारांवर कंपनीत नौकरी करतात . प्राध्यापक शिक्षक अधीकारी कर्माचारी नौकरी करीत एखादा घर एखादा प्लाट किंवा फ्लॅट विकत घेत आयुष्य पणाला लावले व सेवानिवृत्त झालेत . हा विचार करीता. पंच्याहत्तर वर्षात हा बदल स्वीकारला . आणि हे थोडं फार मेहनतीने कमवुन घेतले नाही , तर येणाऱ्या काळात ना घर असणार हे ना शेती ना फ्लॅट . मग त्यांची पिढी भविष्यात कशी असणार काय करणार हा विचार करायला नको का . हे मुलांना कोण समजावून देणार . कारण जीवनात सिधा साधा सरळ नियम आहे. जो बदल स्विकारत नाही तो आपल्या जिवनात सुखी संपन्न आनंदाची संकल्पना करू शकत नाही . परीस्थितीला आपण बदलुव शकतो , पण परिस्थीतीला गुलाम होऊ देता कामा नये . जे परीस्थीतीचे गुलाम बनतात ते जिवनात कितीही संपन्नता मिळवीली तर सुखी संपन्न समाधानी आनंद जिवन जगु शकत नाही .
देशातील राजकारणात जे परिस्थीतीला गुलाम बनविले त्यांची अवस्था काय आहे हे सांगायची गरज नसावी . जे बिज आपले अस्तित्व संपवु इच्छीत नाही , ते बीज जमीनीत प्रवेश करीत वृक्ष बनण्याची संधी स्वता नष्ट करण्याची चुक कधीच करणार नाही . अर्थात परिस्थिती एक सारखी असुच शकत नाही . रात्र नंतर दिवस पानझडी नंतर वसंत , उन्हाळा नंतर पावसाळा का हे बदल होत असणारच . जिवनात दुःख नंतर सुख आणि चिंता सदैव कायम राहत नसतात . प्रत्येक परीस्थितीत पिढी नुसार मान सन्मान कायम असायलाच पाहिजे. प्रत्येक स्थिती आणि व्यक्ती कुठे ना कुठे श्रेष्ठ असतोच. अशा माणसांना मनापासून नमस्कार करतो ....दुध दही ताक पनीर तुप लोणी हे वंश पिढी सारखेच आहेत . श्रेष्ठता कर्मानुसार मेहनतीने प्राप्त करता येते. चालत असल तरच शरीर आणि चालवत असल तरच संबंध टिकत असतात . आणि दोन्ही प्रत्येक परीस्थितीत स्वस्थ असतात . ज्यांनी प्रत्येक परीस्थितीत साथ दिली त्यांचा सन्मान पिढी नुसार जपलच पाहिजे . शांती तेव्हाच मिळतं काही क्षणांसाठी नियमीत हे डोळे मिटतात . म्हणुनच चांगले कर्म करीत राहणे . हाच जिवनाचा नियम आहे . म्हणुनच जिवन जगायचं असेल तर आरसा प्रमाणेच जंगल पाहीजे जिथे प्रत्येक पिढी च स्वागतच केले जाते . आणि संग्रह शुन्यातून निर्माण करता आले पाहिजे .
्